Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २८ जुलै, २०२१, जुलै २८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-28T12:44:59Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्लीत शाळा केव्हा आणि कशा सुरु होणार? उपमुख्यमंत्र्यांनी मागितल्या सूचना Rojgar News

Advertisement
School Reopen: करोना प्रादुर्भाव अद्याप संपला नाही पण अनेक राज्यांमध्ये करोनामुक्त गावांमध्ये झाल्या आहेत. आता दिल्लीमध्ये केव्हा आणि कधी सुरु होणार? याबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एक डिजिटल पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सूचना मागितल्या आहेत. जवळच्या राज्यांमध्ये शाळा, कॉलेज सुरु झाले आहेत. दिल्लीमध्ये पालक देखील शाळा कॉलेज सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत. पण शाळा कॉलेज सुरु करायला हवेत का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांनी विचारला. पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपली सूचना DelhiSchools21@Gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. मनीष सिसोदिया यांनी म्हटले, दिल्लीमध्ये रोज ७५ हजारहून अधिक चाचण्या होत आहेत. प्रत्येक दिवशी करोना व्हायरसच्या ४०, ५०, ६० केसेस समोर येत आहेत. अशावेळी करोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे असे आपण म्हणू शकतो. तर इतर राज्यांचा अनुभव पाहता आपल्याला शाळा सुरु करायला हव्या का? यावर आपला सल्ला पाठवा. ज्यांची मुलं खासगी आणि सरकारी शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणार आहेत त्यांनी आपल्या सूचना पाठवा. सरकारच्या निर्णयाच्या आधी आम्हाला विद्यार्थ्यांच्या आईवडीलांच्या सूचनेला महत्व द्यायचे आहे. शाळा उघडल्या गेल्या तर करोना काळात काय काळजी घ्यायला हवी? याबद्दल विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी मिळून सरकारला सांगावे असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणाले. दिल्ली विद्यापीठामध्ये पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी सुरु करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, एमफिल आणि पीएचडी कोर्ससाठी प्रवेश (DU Admission 2021) सुरु झाले आहेत. पीजी, एमफिल आणि पीएचडीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट du.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. दिल्ली विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (डीयूईटी) आधारित कोर्सेससाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पदवी अंतर्गत कोर्सेसमध्ये प्रवेश (DU Admission 2021) घेण्यासाठी दिल्ली विद्यापीठ प्रवेश २०२१ प्रक्रिया पुढचे दोन आठवडे म्हणजे २ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f15F67
via nmkadda