Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जुलै, २०२१, जुलै ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-06T07:47:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SBI Apprentice Recruitment 2021: अप्रेंटिसशिपच्या ६१०० जागा रिक्त, पदवीधरांना संधी Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि याची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने देशातील विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एसबीआय शाखांमध्ये अप्रेंटिस पदावर काम करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे एकूण ६१०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बॅंकमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅंकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामाध्यमातून ते ऑनलाइन अर्ज करु शकतात. एसबीआय अप्रेंटिसशिपची प्रक्रिया ६ जुलैपासून सुरु झाली आहे. उमेदवार २६ जुलैपर्यंत आपला अर्ज सबमिट करु शकतात. शैक्षणिक पात्रता भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये ६१०० अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२१ ला २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. एसबीआयने आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार नोटिफिकेशन वाचू शकतात. निवड प्रक्रिया आणि स्टायपेंड एसबीआयमध्ये अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ऑनलाइन लेखी परीक्षेमध्ये जनरल/फायनांशिअल अवेअरनेस, जनरल इंग्रजी, क्वांटीटेटीव्ह अॅप्टीट्यूड आमि रिजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्यूटर एप्टीट्यूड विषयांचे एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षा १ तासाांची असेल आणि एकूण शंभर मार्कांची असेल. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी निमंत्रित केले जाणार आहे. अंतिम निवड झाल्यानंतर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना सुरुवातीस १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36h2GC4
via nmkadda