Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३ जुलै, २०२१, जुलै ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-03T08:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC Exam Dates: एसएससी CHSL, CGL, SI आणि ASI परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर Rojgar News

Advertisement
SSC New Exam Dates 2021, SSC CHSL, CGL 2021 and SI in Delhi Police, CAPFs and ASI in CISF: कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission या SSC)दिल्ली पोलीस (Delhi Police)आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०१९ पेपर-2 सह एसएससी सीजीएल (SSC CGL) आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-1 परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. कोविड -१९ महामारी संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध परीक्षांच्या आयोजनासंदर्भात तारखांमध्ये बदल केले आहेत. ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षांसाठी (SSC Jobs) अर्ज केला होता, ते एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन नवी नोटिस पाहू शकतात. एसएससी भरती परीक्षेच्या या नोटिफिकेशनची थेट लिंकदेखील या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. SSC SI and ASI Exam Date आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या री-शेड्यूल एक्झाम नोटीसनुसार, दिल्ली पोलीस आणि सीएपीएफ (CAPFs)मध्ये सब इन्स्पेक्टर आणि सीआयएसएफ (CISF) असिस्टंट सब इन्स्पेक्टर परीक्षा (पेपर- II) 2019 चे आयोजन २६ जुलै २०२१ रोजी विविध परीक्षा केंद्रांवर केले जाईल. SSC CHSL Exam Date कंबाइंड हायर सेकेंडरी (10 + 2) लेवलची परीक्षा (SSC CHSL Exam) (टियर- I)उर्वरित उमेदवारांसाठी ४ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आयोजित केली जाईल. SSC CGL Exam Date कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन (टीयर-1) परीक्षा 2020 चे आयोजन १३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत केले जाईल. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर भेट देता येईल. कोविड-१९ मुळे बदललं वेळापत्रक यापूर्वी, SSC CHSL परीक्षा १२ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार होती आणि २० एप्रिल रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. एसएससी सीजीएल टियर- I कॉप्युटर आधारित संयुक्त पदवी स्तरीय परीक्षा २०२१ (सीजीएल परीक्षा 2021) २९ मे ७ जून पर्यंत आयोजित करण्यात आली होती. एसएससी एसआय पेपर 2 परीक्षा १२ जुलै रोजी त्या उमेदवारांसाठी आयोजित होणार होती, जे पात्र ठरले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UpLQyg
via nmkadda