Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-08-09T13:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE: दहावी, बारावी रिझल्टवर नाराज विद्यार्थ्यांसाठी डिस्प्यूट रिड्रेसल पॉलिसी जाहीर Rojgar News

Advertisement
10th 12th result verification: यावर्षी सीबीएसई दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही निकालावर समाधानी नसाल तर तुमच्याकडे परीक्षे देण्याशिवाय आणखी एक पर्याय आहे. सीबीएसई बोर्ड तुम्हाला रिझल्ट/गुण पडताळणीची ( Marks verification 2021) संधी देणार आहे. यासाठी बोर्डाने डिस्प्यूट रिड्रेसल पॉलिसी () जाहीर केली आहे. या पॉलिसीचा कसा फायदा घेता येईल? याची माहिती घेऊया. बोर्डाने रिझल्ट संदर्भातील वाद चार भागांमध्ये मांडले आहेत. भाग १ आणि भाग २- सीबीएसईच्या निर्देशानुसार रिझल्ट कमिटीने निकाल लावला आणि बोर्डाच्या वेबसाइटवर कॉम्प्युटेशनसाठी अपलोड केला. जर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर नाराज असतील तर ते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना रिझल्ट व्हेरिफिकेशनसाठी सांगू शकतात. भाग ३- विद्यार्थ्यांनी अर्ज न करतानाही रिझल्ट कमेटीला वाटले की त्यांच्याकडून गुण मोजमाप किंवा अपलोडींगमध्ये काही चूक झाली आहे. भाग ४ - रिझल्ट तयार करणाऱ्या पॉलिसीवर वाद. ही पॉलिसी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांतर्फे देण्यात आली आहे. जर कोणाला पॉलिसीसंदर्भात काही तक्रार असेल तर ते भाग ४ मध्ये येईल. कोणत्या भागाचे कसे निराकरण होईल? भाग १ - सर्वात आधी विद्यार्थी मुख्याध्यापकांकडे रिझल्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील. यामध्ये विद्यार्थ्यांनी संपूर्ण तपशिल द्यायला हवा. मुख्याध्यापक हा अर्ज निकाल तयार करणाऱ्या रिझल्ट कमिटीकडे पाठवतील. कमेटी सीबीएसई रिझल्ट पॉलिसी २०२१च्या निर्देशानुसार रिझल्ट व्हेरिफिकेशन करेल. सर्व रेकॉर्ड आणि कागदपत्र तपासले जातील. काही चूक नसेल तर शाळा त्या विद्यार्थ्याला उत्तर पाठवेल. भाग २ - भाग १ च्या प्रक्रियेमध्ये रिझल्ट कमिटीच्या निकालात काही चूक आढळली तर कमेटीतर्फे संबधीत कागदपत्र मुख्याध्यापकांना दिली जातील. सोबतच चूक का झाली? याचा इतर विद्यार्थ्यांच्या निकालावर काय परिणाम झाला? याची माहिती दिली जाईल. त्यानंतर मुख्याध्यापक ही कागदपत्र सीबीएसई रिजनल ऑफिसला (CBSE RO) पाठवतील. तिथे सीबीएसई पॉलिसी अंतर्गत तपासणी होईल. त्यानंतर रिझल्ट टॅब्युलेशन पॉलिसीमध्ये गरजेचे बदल केले जातील. भाग २ साठी शाळा रिक्वेस्ट सबमिशन फॉर रिझॉल्यूशन (SRSR) सिस्टिमच्या माध्यमातून ऑफिसला अर्ज पाठवले जाती. याची लिंक शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. भाग ३ - शाळा SRSR च्या माध्यमातून रिजनल ऑफिसला विनंती करेल. यामध्ये भाग ३ सिलेक्ट करेल. याचा अर्थ गुणांची चुकीची पडताळणी किंवा रिझल्ट अपलोडींगमध्ये गोंधळ आहे. CBSE Marks Verification 2021 Schedule: महत्वाच्या तारखा भाग १ साठी- विद्यार्थ्यांना ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत अर्ज करा लागेल. रिझल्ट कमिटीला व्हेरिफिकेशनसाठी १० ते १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला जाईल. भाग २- शाळांना ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत रिप्रेझेंटेशन पाठवावे लागेल. रिझल्ट कमेटी १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टदरम्यान व्हेरिफिकेशन पूर्ण करेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jFrFVM
via nmkadda