Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-08-05T13:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Delhi University: 'या' विद्यार्थ्यांसाठी उघडले जाऊ शकते कॅम्पस Rojgar News

Advertisement
Delhi University: दिल्ली विद्यापीठातर्फे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस उघडला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विचार सुरु असून लवकरच निर्देश जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे रजिस्टार विकास गुप्ता यांनी सांगितले. पदवी कोर्सेसच्या प्रवेशाबद्दल माहिती देताना ते बोलत होते. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विषयाचे प्रॅक्टीकल आणि प्रोजेक्ट वर्क असेल ते कॅम्पस आधी सर्वात आधी उघडले जाण्याची शक्यता असल्याचे विकास गुप्ता म्हणाले. दिल्ली विद्यापीठात २ ऑगस्टपासून यूजी आणि २६ जुलैपासून पीजी कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शुल्कात वाढ नाही करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात कोणती वाढ करण्यात येणार नसल्याचे दिल्ली विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. करोनाचा परिणाम सर्व क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रावर देखील झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच व्यवसाय बंद झाले. अशावेळी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक भार पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज मागे घेतल्यावर पूर्ण शुल्क परत दिल्ली विद्यापीठातर्फे 'डीयू प्रवेश २०२१' साठी शुल्कात वाढ न करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला. मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला विविध कॉलेजमध्ये घेतलेला प्रवेश मागे घ्यावा लागतो. अशावेळी त्याने जमा केलेले शुल्क परत केले जाणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज देशभरातील विविध विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये यूजी, पीजी कोर्सेससाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यूजी कोर्सेससाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे. दिल्ली विद्यापीठातर्फे यूजी कोर्सेससाठी सोमवारी रात्री ८ वाजता अर्जाचे पोर्टल सुरु करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रवेश वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४ हजार ९९४ अर्जदारांनी विविध कोर्सेससाठी नोंदणी केली होती. पोस्टग्रॅज्युएशन (PG) कोर्सेससाठी विद्यापीठातर्फे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता साधारण २० हजार जागांसाठी ७६ हजार १६० नोंदणी झाली. तर एमफील/पीएचडी साठी १० हजार ८३५ अर्ज आले आहेत. MPhil/PhD आणि PG कोर्सेससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलैला सुरु झाली होती. तर या कोर्सेसना अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२१ आहे. यूजी कोर्सेसची पहिली कट ऑफ लिस्ट केव्हा येणार? सीबीएसई, आयएससी बोर्डांनी आपले निकाल जाहीर केले आहेत. काही राज्यांनी आपले निकाल अद्याप जाहीर केले नाहीत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजी कोर्सेससाठी पहिली कट ऑफ लिस्टची घोषणा ७ ते १० सप्टेंबर दरम्यान करण्यात येईल. विद्यापीठातर्फे गुण अपडेट करण्यासाठी नंतर विंडो खुली केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rVqIfE
via nmkadda