Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ११, २०२१ WIB
Last Updated 2021-08-11T08:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Global Youth Development Index: जगातील युवा विकासात भारताचे स्थान कितवे? जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Global Index 2020: जगातील युवा विकासामध्ये भारत हा १२२ व्या स्थानी आहे. भारत वर्ष २०१० ते २०१८ दरम्यान क्षेत्रामध्ये सर्वात वेगवान उभरणाऱ्या ५ देशांमध्ये आहे. भारतासोबतच रशिया, अफगाणिस्तान, इथियोपिया आणि बर्कीना या देशांमध्ये वेगाने युवकांचा विकास झाला. तसेच शिक्षण आणि रोजगार क्षेत्रामध्ये १५.७४ टक्के वाढ झाली. लंडन स्थित कॉमनवेल्थ सेक्रेटरिएटद्वारे जाहीर करण्यात आलेल्या त्रैवार्षिक रॅंकिंग- ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स २०२० मधून ही बाब समोर आली. सिंगापूर सर्वात पुढे कॉमनवेल्थ सेक्रेटेरिएटच्या ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स २०२० मध्ये सिंगापूर पहिल्या स्थानी आहे. या रॅंकिंगमध्ये सिंगापूरनंतर क्रमश: स्लोवेनिया, नॉर्वे, माल्टा आणि डेनमार्क यांना स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे रॅंकिंग नंबर नुसार ज्या देशांमधील युवकांमध्ये सर्वात कमी विकास झालाय त्यामध्ये चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सूडान, अफगाणिस्तान आणि नायजर यांचा समावेश आहे. ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स २०२० बद्दल कॉमनवेल्थ सेक्रेटेरिएटमध्ये जनरल सेक्रेटरीने म्हटले, 'तरुण लोकसंख्येसाठी एक असे भविष्य देण्याची गरज आहे जे अधिक न्यायपूर्ण, सर्वसमावेशक, शाश्वत आणि परिस्थिती-आधारित असेल. निर्धारित मानदंडांच्या आधारे त्यांचे योगदान आणि गरजा लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी आम्ही सकारात्मक प्रभाव वाढवू शकतो. अशा प्रकारे लाभलेले तरुण आपल्या सर्वांना चांगल्या भविष्याच्या दिशेने जोडण्यास सक्षम आहेत.' ते म्हणाले, 'आमचे ग्लोबल युथ डेव्हलपमेंट इंडेक्स २०२० हे एक महत्त्वाचे माध्यम आहे ज्यामध्ये युवक आपल्या समाजाला फायदेशीर योगदान देण्यासाठी किती प्रमाणात गुंतले आहेत आणि समाजाप्रति त्यांनी आपली क्षमता, धोरणं अधिक सशक्त केली याचे मूल्यमापन केले गेले.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CMAciH
via nmkadda