Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T05:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Mains Result 2021: जेईई मेन सत्र ३ चा निकाल लवकरच, जाणून घ्या अपडेट Rojgar News

Advertisement
2021: जेईई मेन सेशन ३ च्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, ) तर्फे पुढच्या आठवड्यात निकालाची घोषणा केली जाऊ शकते. एनटीए जेईई मेन सत्र ३ च्या पुनरपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा करेल. राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त देशभरातील उमेदवारांसाठी जेईई मेन परीक्षा २०,२२,२५ आणि २७ जुलैला आयोजित करण्यात आली होती. यानंतर एनटीएने ३ आणि ४ ऑगस्टला या विभागांमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली. ही परीक्षा ४ ऑगस्टला संपली आहे. आता एनटीएतर्फे लवकरच जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. जेईई मेन परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in लॉगिन करावे लागेल. यानंतर होमपेजवर 'जेईई मेन्स निकाल २०२१ निकाल' या लिंकवर क्लिक करा. यानंतर लॉगिन क्रेडेंशियल टाका. जेईई मुख्य निकालाचा तपशिल पाहा.जेईई सत्र ३ २०२१ निकालाची गुणपत्रिका डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा. एनटीएतर्फे याप्रकरणी कोणती अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. पण पुढच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. रिझल्टची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अधिक अपडेट तपासू शकता. यावर्षी जेईई मेन निकाल सत्र ३ साठी ७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर जेईई मेन निकालासोबत एनटीएतर्फे कटऑफ आणि गुणपत्रिका जाहीर करण्यात येईल. निकालासंदर्भातील अपडेट पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fB9C1W
via nmkadda