Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T19:44:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

१७ ऑगस्टपासून पुन्हा शाळा सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन वर्गात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. राज्यातील शहरांमध्येही आता१७ ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या आठवड्याभरात अंतिम निर्णय होईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात करोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. आता उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. हा निर्णय घेताना आता नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळाही सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक आहे. आता निर्णय घेताना पाचवीपासून वर्ग सुरू करण्याचा विभागाचा मानस आहे. यानंतर लवकरच इयत्ता पहिलीपासून वर्ग सुरू करण्यात येतील असेही सूत्रांकडून समजते. १ ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार निर्बंध शिथील झालेल्या भागांमध्ये शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे निर्णय स्वतंत्रपणे लागू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे विभागाने घेतलेला निर्णय हा पुन्हा जिल्हाधिकारी किंवा अन्य प्राधिकरणाच्या परिक्षणातून जाणार नाही. परिणामी शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मार्च २०२० पासून राज्यातील शाळा करोनामुळे बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही दुष्परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे प्रत्यक्ष शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी सूचना शिक्षणतज्ज्ञ सातत्याने करत आहेत. याचा विचार करून लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, असे गायकवाड यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आठ लाख विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शिक्षण सुरू शालेय शिक्षण विभागाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंतच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जुलैच्या आकडेवारीनुसार राज्यातील ग्रामीण भागातील १२ हजार ७२५ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये आठ लाख ९८ हजार ८९४ विद्यार्थी सध्या प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कुल उपक्रम चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. शालेय शिक्षण विभागातर्फे शासकीय शाळा ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कुल’ उपक्रमांतर्गत आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राजर्षि छत्रपती शाहु महाराज शालेय शिक्षण परिवर्तन निधीअंतर्गत सामाजिक दायित्वातून सहभाग मिळवण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहेत. या निधीतून राज्य सरकार पहिल्या टप्प्यात ४७१ शासकीय शाळांचे परिवर्तन करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी राज्यातील ४० नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jq8tLE
via nmkadda