Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T16:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाचा बीई मेकॅनिकल इंजिनीअरिंग सत्र ८ परीक्षेचा निकाल ९९.७६ टक्के Rojgar News

Advertisement
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचा चतुर्थ वर्ष बीई (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) सत्र ८ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत ९९.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण ५ हजार ४८१ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ५६४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर १ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होता. तसेच या परीक्षेत १३ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत २०२१ च्या उन्हाळी सत्राचे ११६ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग ) सत्र ८ समवेत तृतीय वर्ष बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मिडीया प्रॉडक्शन) सत्र ६, एमएस्सी भाग २, बीई ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ) सत्र ८ व बीएसडब्ल्यू सत्र ६ असे पाच निकाल जाहीर केले आहेत. दृष्टीक्षेपात निकाल - नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी : ५,५६५ परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी : ५,५६४ अनुत्तीर्ण विद्यार्थी - १ उत्तीर्ण विद्यार्थी - ५.४८१ अनुत्तीर्ण विद्यार्थी - १३ उत्तीर्णतेची टक्केवारी - ९९.७६


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rOMNN4
via nmkadda