Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T12:45:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एलआयसीच्या एई आणि एएओ पदांच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News

Advertisement
AE AAO Prelims 2021: भारतीय जीवन बीमा निगम (Life Insurance Corporation of India) ने एई (AE) आणि एएओ पदांसाठी (AAO) आयोजित होणाऱ्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार, असिस्टंट इंजिनीयर (Assistant Engineers) आणि असिस्टंट आर्किटेक्ट (Assistant Architect) पदांसाठी आयोजित होणारी परीक्षा ऑगस्टमध्ये २८ तारखेला आयोजित केली जाणार आहे. या संबंधी एलआयसीने अधिकृत वेबसाइट licindia.in वर एक नोटिफिकेशन जारी केले आहे. अधिकृत नोटिसनुसार परीक्षा ४ एप्रिल २०२० रोजी आयोजित होणार होती. पण नंतर ही परीक्षा लांबणीवर टाकली होती. आता ही परीक्षा ऑगस्ट मध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड भारतीय जीवन बीमा निगम (LIC) परीक्षा सुरु होण्याआधी १५ दिवसांच्या आत उपलब्ध करेल. त्यामुळे हॉल तिकीट पुढील आठवड्यापर्यंत जारी होऊ शकतात. त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर नजर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रासह आपले फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. यात तर्क क्षमता, इंग्रजी भाषा, व्याकरण, शब्दावली आदींवर प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी १ तासाचा असेल. या व्यतिरिक्त ७० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जातील. जे उमेदवार पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. यात वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक वर्ष विचारले जातील. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २१८ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ फेब्रुवारीला सुरू झाली आणि १५ मार्च २०२१ रोजी संपली. भरती प्रक्रियेविषयीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एलआयसीचे अधिकृत संकेतस्थळ पाहावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ipRiur
via nmkadda