Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ८ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-08-08T17:44:17Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बेनेट युनिव्हर्सिटीचा तिसरा दीक्षांत समारंभ: विद्यापीठाने रुजवली संशोधन आणि नाविन्यतेची संस्कृती - धर्मेंद्र प्रधान Rojgar News

Advertisement
नवी दिल्‍ली: बेनेट विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ रविवारी ८ ऑगस्ट रोजी संमारंभपूर्वक पार पडला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शिक्षण क्षेत्रातील बेनेट विद्यापीठाच्या योगदानाबाबत प्रधान यांनी समाधान व्यक्त केले. खूप कमी कालावधीत एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र म्हणून विद्यापीठाची वाटचाल झाली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यापीठाने रिसर्च आणि इनोव्हेशनची संस्कृती रुजवली असल्याचेही ते म्हणाले. बेनेट युनिव्हर्सिटी का तिसरा दीक्षांत समारंभ ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. यात केंद्रीय शिक्षणबेनेट युनिव्हर्सिटीचा तिसरा दीक्षांत समारंभ... धर्मेंद्र प्रधान म्हणाले- विद्यापीठाने रुजवली संशोधन आणि नाविन्यतेची संस्कृतीमंत्री धमेंद्र प्रधान यांच्यासह देशातील अनेक नामवंत सहभागी झाले होते. बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ किरण मजुमदार शॉ आणि नेस्‍ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण कार्यक्रमाचे 'गेस्‍ट ऑफ ऑनर' म्हणून उपस्थित होते, तर NASSCOM च्या अध्यक्ष देबजनी घोष यांनी 'स्‍पेशल गेस्‍ट' म्हणून उपस्थिती लावली होती. युनिव्हर्सिटीचे कुलपती विनीत जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कुलगुरू डॉ. प्रभु अग्रवाल यांनी युनिव्हर्सिटीचा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमात शिक्षणमंत्री म्हणाले की शिक्षण क्षेत्रातील बेनेट युनिव्हर्सिटीचे योगदान पाहून समाधान वाटते. विद्यापीठ स्वत:ला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या केंद्राच्या रुपात पुढे येत आहे. आज नॉलेज इकॉनॉमीच्या जगात नेतृत्व करण्यासाठी आणि अन्य उच्च शिक्षण संस्था जागतिक रिसर्च आणि इनोवेशनच्या अग्रदूत बनत आहेत. मला आनंद आहे की बेनेट युनिव्हर्सिटीने रिसर्च आणि इनोवेशनची संस्कृती रुजवली आहे. ९८ रजिस्टर्ड पीएचडी विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांना विद्यापीठ निधी देत आहे. शिक्षणमंत्री म्हणाले की योग्य फॅकल्टी, प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पब्लिकेशनच्या मजबूत रेकॉर्डसह बेनेट युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांनी १८ पेटंट फाइल केले आहेत. हे विद्यापीठाचं खूप मोठं यश आहे. विद्यापीठाचे ४१२ विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. प्रधान यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचं हे यश आहे, हा त्यांचा दिवस आहे, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. शिक्षणमंत्री म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट', मल्टिपल एन्ट्री-एक्झिट सिस्टीम, नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम सह NEP 2020 चे अनेक महत्त्वपूर्ण घटक लाँच केले. बेनेट युनिव्हर्सिटीने अनेक लाइव्ह वेबिनार आणि सेमिनार आयोजित करून NEP 2020 संबंधी विद्यार्थी आणि अन्य शैक्षणिक घटकांमध्ये जनजागृती केली असल्याचा आम्हाला आनंद आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ctz2s4
via nmkadda