Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-29T08:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एलआयसीकडून AAO आणि AE/AA प्रारंभिक परीक्षेचे निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
AAO Result 2021: भारतीय जीवन निगम (LIC of India) AAO आणि AE/AA प्रारंभिक परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. एलआयसीच्या या परीक्षांना बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. प्रारंभिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार रोल नंबर आणि नावानुसार निकाल तपासू शकतात. प्रारंभिक परीक्षा २८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आली होती. LIC 2021: असा तपासा निकाल एलआयसीची अधिकृ वेबसाइट licindia.in ला भेट द्या. होमपेजपर उपलब्ध करियर लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज खुले होईल. संबंधित रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा. आता प्रारंभिक परीक्षा रिझल्ट लिंकवर क्लिक करा. पुन्हा एक नवीन पेज खुले होईल. संबंधित परीक्षा आणि स्ट्रीमनुसार लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर आणि नावानुसार निकाल तपासू शकता. निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. यशस्वी उमेदवारांसाठी फेज २ परीक्षा प्रारंभिक परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार आता फेज २ म्हणजे मुख्य परीक्षेत सहभागी होऊ शकतात. निगमतर्फे अद्याप तारखेची घोषणा करण्यात आली नाही. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अपडेट कळविली जाईल. मुख्य परीक्षेसाठी ३०० गुणांची ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन्ही टेस्ट ऑनलाइन माध्यमातून घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह चाचणीमध्ये प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळा वेळ असेल. तर डिस्क्रिप्टिव्ह चाचणीची उत्तरे उमेदवारांना कॉम्प्युटरवर टाइप करुन द्यावी लागतील. मुख्य परीक्षेच्या आधारे शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zXezcQ
via nmkadda