मुलींसाठी NDA: किती जागा, शारीरिक मापदंड... सर्व माहिती जाणून घ्या Rojgar News

मुलींसाठी NDA: किती जागा, शारीरिक मापदंड... सर्व माहिती जाणून घ्या Rojgar News

प्रा. संजय मोरे
  • महिलांना एनडीए या यूपीएससीमार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलंय. म्हणजेच या परीक्षेसाठी महिला अर्ज करू शकणार आहेत. याच परीक्षेबद्दल जाणून घेऊ या. एनडीएची परीक्षा देऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या अविवाहीत महिला उमेदवारांना सैन्यात लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी आहे.
० प्रवेश क्षमता- ४०० पदं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी ३७० जागा ० परीक्षा केंद्र- मुंबई, नागपूर, पणजी ० पात्रता- बारावी उत्तीर्ण (बारावीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना २४ जून, २०२२पर्यंत बारावी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल) ० वयोमर्यादा- उमेदवाराचा जन्म २ जानेवारी, २००३ ते १ जानेवारी, २००६ दरम्यानचा असावा. ० शारीरिक मापदंड - उंची- हवाई दलासाठी १६२.५ सेमी; इतर बॅचेसाठी- १५७ सेमी, - वजन- वय आणि उंचीच्या प्रमाणात - दृष्टी- नौदलातील एंट्रीसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९; चष्म्यासह- ६/६, ६/६, हवाई दलातील ग्राऊंड ड्युटी ब्रँचेससाठी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह ६/६, ६/६, फ्लाइंग ब्रँचसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६ ० परीक्षापद्धती- (अ) लेखी परीक्षा- एकूण ९०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. - गणित- अडीच तास, गुण ३०० - जनरल अॅलबिलिटी टेस्ट- अडीच तास, गुण ६०० - जनरल अॅलबिलिटी टेस्ट (पार्ट-ए)- इंग्रजी- २०० गुण, पार्ट-बी- जनरल नॉलेज- ४०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी https://ift.tt/3EZXKBF या संकेतस्थळावर संपर्क साधावा. (ब) एसएसबी मुलाखत- जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाईल. - स्टेज१- ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रीप्शन टेस्ट - स्टेज२- ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क्स, सायकॉलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट चार दिवस चालतील. एसएसबी/मुलाखत एकूण- ९०० गुण ० प्रशिक्षण- निवडलेल्या उमेदवारांना तीन वर्षांचं प्रिलिमिनरी प्रशिक्षण एनडीए, पुणे येथे दिलं जाईल. इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे चार वर्षांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील. फक्त अविवाहीत महिला उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर ८ ऑक्टोंबर, २०२१पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CX9naM
via nmkadda

0 Response to "मुलींसाठी NDA: किती जागा, शारीरिक मापदंड... सर्व माहिती जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel