भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध पदांची भरती Rojgar News

भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध पदांची भरती Rojgar News

SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (, SAI) मध्ये विविध पदांच्या एकूण २२० पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाअंतर्गत विविध खेळांच्या (SAI)सहाय्यक प्रशिक्षक भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील त्यामध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत आहे. प्रशिक्षकांची भरती चार वर्षांच्या प्राथमिक कालावधीसाठी केली जाणार आहे. वार्षिक कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे या कालावधीसाठी ही भरती होईल. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, कबड्डी, रोइंग, शूटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, ताइक्वांडो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती यासह २१ विविध क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षकपदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना या पदभरतीमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sportsauthorityofindia.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट वाचून घ्यावे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की SAI, NS NIS, किंवा कोणत्याही अन्य मान्यता प्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठातून Coaching मध्ये डिप्लोमा करणारे असे उमेदवार ज्यांनी ऑलिम्पिक / वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले आहे किंवा दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे, यासह राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भागत घेतला आहे, किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळवला आहे, असे उमेदवारा या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. १० ऑक्टोबर ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी, तारीख आणि मुलाखतीचे ठिकाण अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. म्हणून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ocQf4m
via nmkadda

0 Response to "भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel