राज्यातील वाढीव पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती Rojgar News

राज्यातील वाढीव पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती Rojgar News

Rayat Shikshan Sanstha: राज्यातील वाढीव पदांना मान्यता मिळण्याच्या प्रस्तावासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीव पदांना मान्यता देण्याची विनंती सचीव यांनी केली होती. त्यावेळी रयतसह सर्व राज्यातील वाढीव पदांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाईल असे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मंत्री मंडळाच्या पदांना मंजुरी मिळाल्यानंतर या पदभरतीस मंजुरी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. रिक्त शिक्षकांची पदे परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीएआयटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या भरतीस मान्यता देण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hNhY7u
via nmkadda

0 Response to "राज्यातील वाढीव पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel