एनडीएमध्ये महिलांना पुढील वर्षापासून प्रवेश Rojgar News

एनडीएमध्ये महिलांना पुढील वर्षापासून प्रवेश Rojgar News

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 'महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी () देणारी अधिसूचना पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत प्रसिद्ध केली जाईल,' अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. 'वेळेची मर्यादा लक्षात घेता, महिला उमेदवारांच्या सुयोग्य प्रवेशासाठी आणि विनाव्यत्यय प्रशिक्षणासाठी सुनियोजित नियोजन आणि काळजीपूर्वक तयारीची आवश्यकता आहे,' असे मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीद्वारे महिला उमेदवारांना तीनही संरक्षण सेवांमधील विद्यमान अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले आहे. तसेच 'एनडीएमधील महिला कॅडेट्ससाठी एक व्यापक अभ्यासक्रम त्वरित तयार करण्यासाठी संरक्षण सेवांद्वारे एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. यात तज्ज्ञांचा समावेश आहे. एनडीएमध्ये महिला कॅडेट्सच्या प्रशिक्षणासाठी सर्वसमावेशक आणि भविष्यातील प्रस्ताव देण्यासाठी सर्व संबंधित बाबींचा समावेश करण्यासाठी अधिकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे,' असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. एनडीएच्या प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात. मे २०२२पर्यंत आवश्यक यंत्रणा सुरळीत ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या काळात 'यूपीएससी'ला पुढील वर्षी पहिली अधिसूचना प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असेही यात म्हटले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39tygy6
via nmkadda

0 Response to "एनडीएमध्ये महिलांना पुढील वर्षापासून प्रवेश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel