TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेचा निकाल जाहीर, 'असा' करा डाऊनलोड Rojgar News

CBSE Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीच्या खासगी आणि विशेष परीक्षांचे निकाल एक दिवस आधीच जाहीर केले आहेत. हा निकाल ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जाहीर होणार असे म्हटले जात होते. सीबीएसईतर्फे सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. पण आता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील विशेष परीक्षेत सहभागी झालेले झालेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. CBSE 12th Result 2021: असा तपासा निकाल दहावी आणि बारावीचा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा. आता लेट अपडेट विभागात जा आणि योग्य लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाका. आता तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रिनवर येईल. रिझल्ट तपासून घ्या आणि डाऊनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढा. बारावी सीबीएसई सुधार परीक्षा २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. बोर्डातर्फे लवकरच दहावीच्या विशेष परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने त्यांचा निकाल तपासू शकतात. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसाठी यावर्षी साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. करोना प्रादुर्भावाच्या साथीमुळे परीक्षा रद्द करण्यात आली आणि अंतर्गत मूल्यांकन धोरणाच्या आधारे निकालाची घोषणा करण्यात आली. एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी यावर्षी विशेष ऑफलाइन परीक्षेला उपस्थित होते. 'या' विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि नोंदणी शुल्क माफ करोना प्रादुर्भावात आपले पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, बोर्डाशी संलग्न शाळांना अशा विद्यार्थ्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्यता पडताळून एलओसी सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी २०२१-२२ साठी शाळांना एलओसीसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत तपशील सादर करायचा आहे. त्यानंतर विलंब शुल्कासहित ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत माहिती द्यावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CVZXMG
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या