दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशभक्त होईल- मुख्यमंत्री केजरीवाल Rojgar News

दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशभक्त होईल- मुख्यमंत्री केजरीवाल Rojgar News

Delhi School : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी आम आदमी पक्ष (AAP) सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'देशभक्ती अभ्यासक्रमा'चे औपचारिक उद्घाटन केले. या अभ्यासक्रमामुळे दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशभक्त होईल असे यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त छत्रसाल स्टेडियममध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. आजकाल लोकांना फक्त तिरंगा फडकवताना किंवा राष्ट्रगीत गाण्यातच देशभक्ती वाटते. गेल्या ७४ वर्षांत आम्हाला आमच्या शाळांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित शिकवले गेले पण मुलांना 'देशभक्ती' शिकवली गेली नाही. देशभक्ती आपल्या सर्वांच्या आत आहे पण त्यासाठी प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. यामुळे दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशभक्त होईल. देशभक्तीपर अभ्यासक्रम देशाच्या विकासात उपयुक्त ठरेल आणि भारताला वेगाने पुढे नेईल असे यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. 'भारत माता की जय', 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'वंदे मातरम' च्या घोषणा देत मुख्यमंत्री म्हणाले, 'आम्हाला असे वातावरण विकसित करण्याची गरज आहे ज्यात आपण आणि आपल्या मुलांमध्ये प्रत्येक पायरीवर देशभक्तीची भावना असेल. केजरीवाल म्हणाले की, 'सर्व प्रकारचे व्यावसायिक बाहेर येत आहेत आणि 'देशभक्त व्यावसायिक' विकसित होत नाहीत. आम्ही व्यवसायांना प्रोत्साहन देणार नाही असा याचा अर्थ नाही. आम्ही सर्व प्रकारच्या शिक्षणाचे समर्थन करत राहू पण त्यांच्यामध्ये देशभक्तीची मूल्ये रुजवू. आम्ही 'देशभक्त' डॉक्टर, वकील, इंजिनीअर, अभिनेते, गायक, कलाकार, पत्रकार इत्यादी विकसित करू.' देशभक्तीपर अभ्यासक्रम नर्सरीपासून बारावीपर्यंत सुरू केला जाईल. अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक असणार नाही. सहाय्यक नर्सरी ते इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी या तीन गटांसाठी तयार केलेल्या लहान पुस्तिका असतील. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, 'आम्ही भगतसिंग, हेमू कलानी, झाशीची राणी आणि तात्या टोपे यांच्या लढाईंबद्दल बोलतो, पण त्यांना लढाई का करावी लागली? यावर आम्ही कधीही चर्चा केली नाही. देशभक्तीपर अभ्यासक्रम हे अंतर कमी करेल' असे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3igNHy6
via nmkadda

0 Response to "दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशभक्त होईल- मुख्यमंत्री केजरीवाल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel