Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-30T11:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्लीतील शाळा सुरु करताना DDMA ने जाहीर केले निर्देश Rojgar News

Advertisement
Reopen: दिल्ली सरकारच्या आदेशानंतर आता १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या निर्णयानंतर सर्व वर्गांसाठी शैक्षणिक संस्था उघडल्या जाणार आहेत. नववी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहेत. आता १ नोव्हेंबरपासून डीडीएमएने शाळा उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती असणे गरजेचे आहे. शाळांसाठी असलेल्या वर्गखोल्यांच्या आसन क्षमतेच्या ५०% पर्यंतच वर्ग भरले जातील. यासोबतच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना शाळेच्या परिसरात प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन दोन सत्रांमध्ये वर्ग घेण्यात यावे अशी सूचना देण्यात आली आहे. शाळेचे सकाळचे सत्र सुटल्यानंतर आणि दुपारचे सत्र सुरु होण्यादरम्यान १ तासाचे अंतर असणे गरजेचे आहे. लसीकरण किंवा रेशनिंग केंद्रांसाठी देण्यात आलेल्या शाळांमधील जागा स्पष्टपणे ठरवून घेणे गरजेचे आहे. शैक्षणिक काम सुरु असलेले ठिकाण हे त्यापासून वेगळे असावे याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन्ही क्षेत्रातील लोकांची एकमेकांशी भेट होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. दुपारचे जेवण, पुस्तके किंवा इतर कोणत्याही वस्तूंची एकमेकांसोबत देवाणघेवाण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. या गोष्टींमुळे स्पर्श वाढून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. दिल्लीच्या शाळांमध्ये होणार पालक संवाद कार्यक्रम दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांशी नियमितपणे संपर्क साधला जाणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी 'पालक संवाद' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 'पालक संवाद: चला पालकांशी बोलूया' असे या कार्यक्रमाचे नाव असून या कार्यक्रमांतर्गत १८ लाखांहून अधिक पालकांशी थेट संपर्क साधला जाईल असे सिसोदिया यांनी यावेळी सांगितले. त्यागराज स्टेडियममध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वसाधारणपणे पालकांद्वारे दोन प्रकारची काळजी घेतली जाते. एकतर विद्यार्थ्यांची अजिबात काळजी घेतली जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्तच काळजी घेतली जाते. हे दोन्ही प्रकार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हानिकारक आहेत असे मनिष सिसोदिया म्हणाले. पालक एकतर मुलांचे बॉस बनतात आणि त्यांना सूचना देतात किंवा पालकांची नवीन पिढी मुलांना मित्र बनविण्याचा प्रयत्न करते. पण मुलांना फक्त पालक हवे असतात. बॉस किंवा मित्र नको असतात. त्यांच्या आयुष्यात ही भूमिका साकारण्यासाठी वेगवेगळे लोक असतात असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nKpDWq
via nmkadda