Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T08:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ISCE दहावी आणि बारावीच्या परीक्षा हायब्रिड माध्यमातून होण्याची शक्यता Rojgar News

Advertisement
ISCE Exam: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सतर्फे (CISCE) आगामी ICSE म्हणजेच दहावी परीक्षा २०२२ आणि ISC म्हणजेच बारावी परीक्षा २०२२ हायब्रिड मोडमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे. या नवीन फॉरमॅट अंतर्गत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपस्थित राहण्याचा पर्याय दिला जाईल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होणाऱ्या टर्म १ साठी हायब्रिड मॉडेल अनुसरले जाऊ शकते. अद्याप परिषदेने यासंदर्भात अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही. मीडियातील वृत्तानुसार परिषदेने शाळांना याबाबत माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टर्म १ परीक्षा कशी घ्यावी याबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सीआयएससीईच्या अधिकाऱ्यांनी सर्व शाळा मॅनेजमेंटशी सल्लामसलत केली आहे. आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या पहिल्या सेमिस्टर परीक्षांसाठी, विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने शाळेत परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पालकांची परवानगी नसेल तर विद्यार्थ्यांना ऑफलाइन माध्यमातून परीक्षा देता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यासाठी शाळांना प्रॉक्टर, बफर प्रोक्टर आणि आयटी एक्झिक्युटिव्हची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, प्रत्येक शाळेला परीक्षा तयारी प्रक्रियेचा भाग म्हणून किमान एक ते जास्तीत जास्त तीन आयटी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह नियुक्त करावे लागतील. याशिवाय, या अहवालात असेही म्हटले आहे की, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनचा वापर करु शकतील. बोर्डाने दिलेल्या निर्देशानुसार परीक्षेवेळी कॅमेरा असणे गरजेचे आहे. ऑनलाईन परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव त्यांचे कॅमेरे बंद करता येणार नाहीत. असे केल्यास त्यांच्यावर गुण कापण्याची कारवाई केली जाईल. प्रत्येक पाच मिनिटांनी व्हिडिओ स्ट्रीम न केल्यास विद्यार्थ्यांना पाच गुण गमवावे लागतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FwhBIO
via nmkadda