दोन नवीन महाविद्यालयांना देण्यात येणार सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव Rojgar News

दोन नवीन महाविद्यालयांना देण्यात येणार सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव Rojgar News

Delhi University: दिल्ली विद्यापीठाअंतर्गत नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाविद्यालय आणि केंद्रांना विनायक दामोदर सावरकर आणि दिवंगत भाजप नेत्या यांचे नाव देण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा स्वराज, स्वामी विवेकानंद, आणि सरदार पटेल यांच्या नावाने या महाविद्यालयांना/केंद्रांना नाव देण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता असे सूत्रांनी सांगितले. परिषदेतर्फे अटलबिहारी वाजपेयी, सावित्रीबाई फुले, अरुण जेटली, चौधरी ब्रह्म प्रकाश आणि सीडी देशमुख यांची नावे सुचविल्याचे त्यांनी सांगितले. नावांबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार परिषदेने कुलगुरूंना दिले होते. दिल्ली विद्यापीठाला पुरस्कार केंद्रीय विद्यापीठाच्या श्रेणीत दिल्ली विद्यापीठाला यंदाचा 'क्लॅरिव्हेट इंडिया रिसर्च एक्सलन्स सायटेशन' पुरस्कार देण्यात आला आहे. 'क्लॅरिव्हेट इंडिया रिसर्च एक्सलन्स सायटेशन' पुरस्कार २०२१ ची ही आठवी आवृत्ती आहे. दर दोन वर्षांतून एकदा हा पुरस्कार दिला जातो. संशोधन क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले होते. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू योगेश सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दिल्ली विद्यापीठातर्फे ट्विट करुन या पुरस्कारासंदर्भात माहिती देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jSOPsC
via nmkadda

0 Response to "दोन नवीन महाविद्यालयांना देण्यात येणार सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel