TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे निर्देश Rojgar News

CBSE Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या आहेत. मायनर विषयांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. बोर्डातर्फे १ डिसेंबर २०२१ पासून प्रमुख विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. आता सीबीएसईने खासगी विद्यार्थ्यांसाठी नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी २ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन अर्ज करू करावा लागणार आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबतच खासगी विद्यार्थ्यांचीही बोर्डाची परीक्षा घेतली जाणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. त्यांना टर्म-१ च्या परीक्षेला बसण्याची आवश्यकता राहणार नाही. परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाइनच माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. तेव्हाच विद्यार्थ्यांना अर्जाचे शुल्कही जमा करावे लागेल. यापूर्वी सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, बारावी वर्गाच्या टर्म-२ बोर्डाच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिल २०२२ मध्ये घेतल्या जातील. हे विद्यार्थी करू शकतात अर्ज १) CBSE द्वारे २०२१ मध्ये रिपिटर म्हणून घोषित केलेले विद्यार्थी. २) ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसईद्वारे कंपार्टमेंट श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. ३) ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसईद्वारे ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ च्या परीक्षांमध्ये कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये स्थान दिले आहे. ४) CBSE द्वारे घेण्यात आलेल्या २०१६, २०१७, २०१८, २०१९ आणि २०१० च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी. ५) CBSE द्वारे घेण्यात आलेल्या २०२१ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत पण त्यांना गुण वाढवायचे आहेत. ६) जे विद्यार्थी सीबीएसईद्वारे घेण्यात आलेल्या २०२० आणि २०२१ च्या परीक्षेत बसले आहेत पण त्यांना एका अतिरिक्त विषयासाठी बसण्याची इच्छा आहे. ७) मान्यताप्राप्त मंडळातून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि दिल्लीची रहिवासी असलेली महिला उमेदवार ८) मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आणि दिल्लीत राहणारे दिव्यांग विद्यार्थी खासगी विद्यार्थ्यांना २० डिसेंबरपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. तसेच विलंब शुल्क भरुन ३० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ च्या बोर्ड परीक्षेत बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांना स्वतंत्र रोल नंबर दिले जातील. विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या रोल नंबरसह परीक्षेला बसू दिले जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E4IqTq
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या