Government job: CRPF मध्ये परीक्षा न देता मिळवा नोकरी, ८५ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Government job: CRPF मध्ये परीक्षा न देता मिळवा नोकरी, ८५ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Recruitment 2021: वैद्यकीय नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ( 2021) मिळण्याची मोठी संधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (SMO) आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरी मिळविण्यासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांना मुलाखतीला हजर राहावे लागते. येथे एकूण ६० आरोग्य अधिकाऱ्यांची (Medical Officer) भरती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या मुदतीच्या आत स्वत:ची नोंदणी करायची आहे. एकदा अर्जाची विंडो बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला नोंदणी करता येणार नाही. त्यानंतर केवळ नोंदणीकृत उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. २२ आणि २९ नोव्हेंबर रोजी विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer, GDMO) (पुरुष आणि महिला) यांची मुलाखत होणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अधिक तपशीलांसाठी नोटिफिकेशनची थेट लिंक खाली दिली आहे. रिक्त जागा तपशील (CRPF MO रिक्त जागा २०२१ तपशील) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (SMOs) - २९ पदे जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स (GDMOs) – ३१ पदे शैक्षणिक पात्रता एसएमओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह पदव्युत्तर पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर जीडीएमओ पदासाठी, अर्जदारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. पगार एसएमओ पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना ८५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर जीडीएमओ पदासाठी अर्जदारांना दरमहा ७५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30fdrFh
via nmkadda

0 Response to "Government job: CRPF मध्ये परीक्षा न देता मिळवा नोकरी, ८५ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel