Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-12T12:43:59Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET UG Re-exam: दोन विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा शक्य नाही- सुप्रीम कोर्ट Rojgar News

Advertisement
NEET UG : दोन विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी घेण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे. टेस्ट बुकलेट आणि उत्तरपुस्तिका जुळत नसल्याने न्यायालयाने फेरपरीक्षेचा आदेश रद्द केला आहे. सुनावणीदरम्यान केंद्राच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट यूजीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. हायकोर्टाने दोन विद्यार्थ्यांच्या नीट निकालाला स्थगिती दिली होती. '१६ लाख मुलांनी परीक्षा दिली आहे. या दोघांना परवानगी दिली तर अशी प्रकरणे येऊ लागतील. मग हा पॅटर्न बनून जाईल. दरवर्षी त्याच पद्धतीने विद्यार्थी पुन्हा परीक्षेसाठी विचारतील' अशी बाजू तुषार मेहता यांनी मांडली. दरम्यान, '२ विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा निकाल रोखता येणार नाही. १६ लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'माफ करा, परंतु दोन विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी परीक्षा पुन्हा घेऊ शकत नाही', असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 'निकाल जाहीर करणे थांबवता येणार नाही हे आम्हाला मान्य असले तरी या दोन्ही विद्यार्थ्यांचे हितही जपले गेले पाहिजे. त्यांना या अवस्थेत सोडता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले. तुमच्या इन्स्पेक्टरने चूक मान्य केली आहे. अशावेळी लाखो विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत ठेवता येणार नाही. आम्ही तुम्हाला निकाल जाहीर करण्याची परवानगी देतो असे सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. तसेच न्यायालयाने दोन्ही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर एनटीएला नोटीस बजावून त्यांचा जबाब मागवला. चुकीचे उदाहरण जावू नये नीट परीक्षेच्या निकालाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, असे केंद्राने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे चुकीचे उदाहरण समोर येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण परीक्षेचा निकाल थांबला आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यास एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होईल अशी बाजू केंद्र सरकारच्यावतीने मांडण्यात आली. निकालास विलंब सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांनी ही विशेष नोटीस जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पीटीशनच्या माध्यमातून आव्हान दिले होते. चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्यामुळे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याशिवाय एनटीएला नीट २०२१ चा निकाल जाहीर करता येत नसल्याने निकालाला विलंब झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत नीट निकालाचा पेच सोडवला. या विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसल्याने त्यांच्यावर अन्याय न करता निकाल जाहीर केला जावा, असे न्यायालयाने एनटीएला सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n6nWDM
via nmkadda