TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

बारावीच्या परीक्षेतील गुणांबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नव्याने तपासणी करा- सुप्रीम कोर्ट Rojgar News

नवी दिल्ली: गुजरातमधील एका शाळेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणांबद्दल केलेल्या तक्रारींची नव्याने तपासणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई समितीला दिले आहेत.सीबीएसई बोर्डाची समिती संबंधित तक्रारीची तपासणी करेल आणि गुणांचे वाटप किंवा तर्कसंगतता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले युक्तिवाद नाकारण्याचे किंवा स्वीकारण्याचे कारण नोंदवेल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. बारावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. 'आम्ही सीबीएसई समितीला याचिकाकर्त्यांच्या तक्रारींची नव्याने तपासणी करण्यास सांगत आहोत. तसेच याचिकाकर्त्यांनी गुणांचे वाटप/तर्कसंगतीकरण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले युक्तिवाद नाकारण्यास किंवा स्वीकारण्याचे निर्देश समितीला देत आहोत असे न्या. एएम खानविलकर आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले. 'आम्हाला देण्यात आलेल्या गुणांची मोजणी ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (CBSE) ३०: ३०:४० फॉर्म्युल्यानुसार करण्यात आली नसल्याची' याचिका काही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. बारावी निकालाशी संबंधित वाद निवारण्यात बोर्ड अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. याआधी दाखल करण्यात आलेली याचिका विद्यार्थ्यांचे प्रतिनिधिक म्हणून ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यामध्ये उपस्थित केलेल्या कारणावर समितीने दोन आठवड्यांच्या आत योग्य ती कारवाई करावी असे निर्देश यावेळी खंडपीठाने दिले. कोणतेही आदेश न देता आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांपर्यंत बोर्ड पोहोचले नसल्याचे यावेळी वकिलांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारे देण्यात आलेले गुण आणि निकालात मिळालेल्या गुणांमध्ये तफावत असल्याचा युक्तीवाद यावेळी वकिलांनी केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wZUPVO
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या