शाळांच्या सुट्ट्या दीपोत्सवानंतर बदलणार? शिक्षण विभागाचे संकेत Rojgar News

शाळांच्या सुट्ट्या दीपोत्सवानंतर बदलणार? शिक्षण विभागाचे संकेत Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शिक्षण विभागातील असमन्वयामुळे सलग तीन वेळेस शाळांच्या दिवाळी सुट्टीत बदल झाल्यानंतर आता पुन्ही दीपोत्सवानंतर सुट्ट्यांचे नियोजन बदलण्याची चिन्हे आहेत. दस्तुरखुद्द शिक्षण विभागानेच त्यासंदर्भात संकेत दिले आहेत. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी सुट्यांमध्ये बदल झाल्याचे स्पष्ट आहे. तर, १२ नोव्हेंबरला सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पुढील सुट्या नियोजित कराव्यात. अन्यथा, नाताळ किंवा उन्हाळी सुट्या वाढवून देण्यात याव्यात, असे निर्देश आहेत. परंतु, शालेय नियोजनानुसार दिवाळीनंतरच काही दिवस सुट्या वाढविल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. पहिली ते बारावीच्या शाळांना दिवाळीनिमित्त २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी लागू करण्यात आली. त्यामुळे ११ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. तर, १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी इयत्त तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गातील उपस्थिती शंभर टक्के असणे अनिवार्य आहे. तर, मुख्यालय सोडून जाण्यास सर्वांना मनाई आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणे आवश्यकच होते. त्यानुसार पूर्व नियोजित सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आले होते. या सर्वेक्षणासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत सुद्धा शाळेत यावे लागत आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक-कर्मचाऱ्यांना सुट्ट्या उपभोगता आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वेक्षणानंतर सुट्यांमध्ये वाढ करून देण्याचा पाठपुरावा शालेय व्यवस्थापनांनी केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने सुट्यांच्या फेरनियोजनाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुट्यांवर परिणाम झालेल्यांना शासकीय नियमानुसार राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये या सुट्या घेता येणार आहेत. स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन या सुट्यांचे समायोजन करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे दिवाळी सुटीतील शिल्लक सुट्या अन्य ठिकाणी योग्य कारणास्तव वापरता येणार आहेत. नाताळात खासगी इंग्रजी माध्यमाच्यांच शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांना दिवाळीतच सुट्या अपेक्षित आहेत. त्यामुळे नाताळाऐवजी दिवाळीतच सुट्या वाढविण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यावर सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. तर, राष्ट्रीय संपादणूक चाचणीनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा सुट्टी देता येईल व स्थानिक नियोजनाप्रमाणे शाळा सुरू करता येतील यावर विचार सुरु आहे. सुट्यांचे बदल असे... ऑक्टोबर प्रारंभी : माध्यमिक शाळांना १ ते २० नोव्हेंबर ऑक्टोबर प्रारंभी : प्राथमिक शाळांना २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २३ ऑक्टोबर : माध्यमिक व प्राथमिक - १ ते २० नोव्हेंबर २७ ऑक्टोबर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mLF4yn
via nmkadda

0 Response to "शाळांच्या सुट्ट्या दीपोत्सवानंतर बदलणार? शिक्षण विभागाचे संकेत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel