TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

इग्नू टीईई २०२१ परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात Rojgar News

Exam: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU)ने टर्म-एंड परीक्षा (TEE) २०२१ साठी नोंदणी सुरू केली आहे. इग्नूतर्फे परीक्षा फॉर्मची लिंक जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी फॉर्म भरता येणार आहे. परीक्षेचा फॉर्म अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर उपलब्ध आहे. टर्म-एंड परीक्षेसाठी १५ डिसेंबर २०२१ नोंदणी फॉर्म भरता येणार आहे. यानंतर १६ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ११०० रुपयांच्या विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज शुल्क प्रति कोर्स २०० रुपये आहे. इग्नू डिसेंबर टीईई २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. अशी करा नोंदणी (term-end examination form) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, (IGNOU) च्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. होमपेजवरील 'Alert' सेक्शनमध्ये जा. 'डिसेंबर २०२१ साठी टर्म-एंड परीक्षा फॉर्म सबमिशन लिंक' वर क्लिक करा. नवीन विंडो उघडल्यावर, 'परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुढे जा' या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी प्रोग्राम कोड, नावनोंदणी क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे ठिकाण भरा. आवश्यक माहिती, कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज शुल्क भरा. 'सबमिट' वर क्लिक करा आणि भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या. विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे असेलेले परीक्षाकेंद्रावर निवडता येणार आहे. तसेच गरज भासल्यास विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र बदलून घेता येणार आहे. ही परीक्षा २० जानेवारी २०२२ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ऑफलाइन माध्यमातून घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी प्रवेशपत्र जाहीर केले जातील. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. सर्व माहिती योग्य रितीने भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30GUmMp
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या