दिल्लीतील सर्व खासगी शाळा सुरु, विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र आवश्यक Rojgar News

दिल्लीतील सर्व खासगी शाळा सुरु, विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र आवश्यक Rojgar News

Delhi : दिल्लीत सर्व आजपासून सुरू झाल्या आहेत. याआधी सरकारने १ नोव्हेंबरपासून सर्व वर्ग उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र सणासुदीमुळे बहुतांश शाळांतील वर्ग पूर्णपणे सुरू झाले नव्हते. आता दिवाळी संपल्यानंतर बहुतांश खासगी शाळांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. काही शाळा टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावण्याचा विचार करत आहेत. वर्गखोल्या, कॅफेटेरिया आणि लायब्ररीची स्वच्छता करण्यात आल्याची माहीत शाळा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली सरकारने राज्यातील सर्व खासगी शाळांना करोना प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. ऑफलाइन वर्गांमध्ये उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पालकांची परवानगी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळेत येताना विद्यार्थ्यांनी पालकांचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पालक हे संमतीपत्र ईमेलवर पाठवू शकतात किंवा फोनद्वारे देखील आपली संमती शाळांमध्ये कळवू शकतात. शाळांनी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉल व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना एक जिना वर चढण्यासाठी आणि दुसरा जिना खाली उतरण्यासाठी असणार आहे. शाळांतर्फे स्कूल बस सुरु होण्यासाठी पावले उचलली जात आहेत. दरम्यान १५ नोव्हेंबरपासून बस सुविधा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील काही खासगी शाळा अजूनही पालकांकडून संमती घेत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ऑफलाइन वर्ग फक्त इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू होत आहेत. प्राथमिक वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती विनाअनुदानित खासगी शाळांच्या कृती समितीच्या महासचिवांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. दिल्लीत गेल्या २४ तासात करोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले. खासगी शाळांबद्दल अधिक अपडेटसाठी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BVOOdR
via nmkadda

0 Response to "दिल्लीतील सर्व खासगी शाळा सुरु, विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र आवश्यक Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel