Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-11-01T11:43:02Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्टाफ सिलेक्शनतर्फे स्टेनोग्राफर पदांची भरती; परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
SSC Steno 2020: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने ग्रेड सी आणि डी भरती परीक्षा २०२० चे(SSC Stenographer Recruitment exam 2020) साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. आयोगाद्वारे विविध क्षेत्रांमधून स्टेनो पेपर १ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. एसएससी स्टेनोग्राफर भरती परीक्षा २०२० साठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.स्टाफ सिलेक्शनमार्फेत स्टेनो ग्रेड सी आणि ग्रेड डी पेपर १ परीक्षा ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत निर्धारित परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र करा डाऊनलोड उमेदवारांनी संबंधित क्षेत्रासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी स्टाफ वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर होमपेजवर दिलेल्या संबंधित 'परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड' लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरा. यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जाची अपडेट जाणून घेता येईल. बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्राची प्रिंट काढा. उमेदवारांना परीक्षेला जाताना ऑनलाइन डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) सोबत ठेवावा लागेल. CBT माध्यमातून होणार परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी परीक्षा २०२० कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) माध्यमातून घेतली जाणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. परीक्षेत जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग इत्यादी विषयांमधून एकूण २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. स्टेनोग्राफर पेपर १ परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कापले जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nGKvOm
via nmkadda