गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी, 'येथे' करा अर्ज Rojgar News

गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी, 'येथे' करा अर्ज Rojgar News

Google Scholarship: कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींना गुगलकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या संबधिंत क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या पण आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थिनींकडून गुगलने मदतीचा हात पुढे केला आहे. कॉम्प्युटर सायन्स फिल्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य करणार आहे. याद्वारे विद्यार्थिनींना १ हजार डॉलर दिली जाणार आहे. यासाठी गुगलद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरणे तसेच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याचे निकष शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदवीपूर्व डिप्लोमा असणे गरजेचे आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात अभ्यासक्रम सुरु असणे गरजेचे कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल फिल्डशी संबंधित अभ्यासक्रम शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक कॉम्प्युटर सायन्स आणि औद्योगिकमध्ये कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना पुढे आणण्यासाठी काय करु शकतो?यावर इंग्रजीत लेख लिहिणे गरजेचे असा करा अर्ज सर्वप्रथम विद्यार्थिनींनी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3wmWUeb वर क्लिक करा. त्यानंतर होमपेजवरील Apply Now वर क्लिक करा. मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा. अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट काढा. स्कॉलरशिप अर्ज भरताना विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आल्यास त्या generationgoogle-apac@google.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. स्कॉलरशिप व्यतिरिक्त इतर कोणत्याही माहितीशी संबंधित प्रश्न या ईमेल आयडीवर विचारु नयेत . जनरेशन गुगल याचे उत्तर देऊ शकत नाही. शिष्यवृत्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. अभ्यासात हुशार असणारे गरीब आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे त्यांचा अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गुगलतर्फे असे अनेक स्कॉलरशिप उपक्रम चालविले जातात . विशेषत: तांत्रिक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने महिलांसाठी हा स्कॉलरशिप उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्या कौशल्यातून स्कॉलरशिप मिळून त्यांचे उत्तम करिअर घडण्यास मदत होऊ शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CUMFjY
via nmkadda

0 Response to "गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी, 'येथे' करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel