Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-20T09:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

टेम्पो चालकाची मुलगी होणार गावातली पहिली डॉक्टर Rojgar News

Advertisement
राजस्थानच्या झलवार जिल्ह्यातील पाचपहाड या गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे. या गावातली एक मुलगी डॉक्टर होणार आहे. ही या गावातली पहिली डॉक्टर असणार आहे. नाझिया असं या मुलीचं नाव असून तिला नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट परीक्षेत () ६६८ गुण मिळाले आहेत. तिचा ऑल इंडिया रँक १७५९ आहे आणि ओबीसी प्रवर्गातील रँक ४७७ आहे. २२ वर्षीय नाझियाच्या यशाचं श्रेय ती अनेक गोष्टींना देते. ती म्हणते की तिच्या यशात तिच्या कोटा येथील अॅलेन इन्स्टिट्यूट या कोचिंग क्लासचाही वाटा आहे आणि तिला राज्य सरकारने ती नववीत असताना दिलेल्या सायकलचाही. आठवी इयत्तेनंतर नाझिया तिच्या गावापासून थोड्या दूर असणाऱ्या भवानीमंडी येथील शाळेत जाऊ लागली. तिला राज्य सरकारने इनाम म्हणून दिलेल्या सायकलमुळे ती रोज इतक्या दूरवर शाळेत जाऊ शकली आणि आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकली. तिच्या कुटुंबात कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. तिला दहावी आणि बारावीला सरकारी शिष्यवृत्तीची मोठी मदत झाली. या साधारण एक लाख रुपयाच्या रोख शिष्यवृत्तीमुळे तिला पुढे शहरात जाऊन कोचिंग घेणे शक्य झाले. नाझियाचे वडिल इसामुद्दीन टेम्पोचालक आहेत. तिची आई अमिना बी शेतात मजुरी करते. नाझियाला बारावीत ९० टक्के गुण होते. परिणामी तिला नीट मध्ये ४८७, ५१८ आणि ६०२ असे गुण पहिल्या तीन प्रयत्नात मिळाले. चौथ्या राउंडमध्ये तिने ६६८ गुण मिळवले. तिच्या यशावर, मेहनतीवर खूश होऊन तिला तिच्या कोचिंगने ७५ टक्के फी परत केली. नाझियाला एमबीबीएस पूर्ण करून स्त्रीरोगतज्ज्ञ व्हायचे आहे. तिची दोन लहान भावंडंही आहेत. बहिणीनेही नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर भाऊ दहावीत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cvGirx
via nmkadda