Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-20T05:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यूजीसी नेट परीक्षेला सुरुवात; ड्रेसकोडसह इतर महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

Advertisement
UGC NET 2021: २०२१ आजपासून म्हणजेच २० नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. ही परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून ५ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे देशातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. यासोबतच परीक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आणि ड्रेसकोडही जाहीर करण्यात आला आहे. यूजीसी नेट २०२१ या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर तपशील तपासू शकतात. UGC NET 2021: महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचले पाहिजे. यूजीसी नेट २०२१ ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित असेल आणि ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेत काही गैरप्रकार आढळल्यास, उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही. प्रवेशपत्रासोबत व्हेरीफिकेशन करण्यासाठी उमेदवारांनी दोन फोटो आणि सरकारी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ओएमआर शीट भरण्यासाठी उमेदवारांकडे काळा/निळा बॉलपॉइंट पेन असावा. उमेदवारांना शर्ट, पूर्ण शूज किंवा कोणतेही फॅन्सी दागिने घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. करोना प्रोटोकॉलचे पालन करून उमेदवारांना फेस मास्क घालणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराकडे स्वतःची हँड सॅनिटायझर बाटली असणे आणि परीक्षाकेंद्रात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. यूजीसी नेट २०२१ ची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जात आहे. याअंतर्गत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा होत आहे. शिफ्ट १ चा पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी सामान्य आहे. तर शिफ्ट २ चा पेपर वैकल्पिक विषयांसाठी आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cM5TwN
via nmkadda