Scholarship: परदेशी शिक्षण अर्जास मुदतवाढ, ऑनलाइन करा अर्ज Rojgar News

Scholarship: परदेशी शिक्षण अर्जास मुदतवाढ, ऑनलाइन करा अर्ज Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना मंगळवार, ९ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. गुणवत्ता असूनही अनेकदा आर्थिक परिस्थितीअभावी विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पैशांमुळे अर्धवट राहू नये व त्यांना चांगल्या संधी मिळाव्यात, तसेच गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळावी यासाठी साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २०१८ पासून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी दाखल करण्यास उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एक नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, ही मुदत आता वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या अर्जाची प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट आवश्यक ती कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह संबंधित विद्यार्थ्याला उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे. यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या जमा झालेल्या सर्व अर्जांची तपासणी करून हे अर्ज तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात संबंधित विभागीय कार्यालयांना ११ नोव्हेबंरपर्यंत जमा करावे लागणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ksTouj
via nmkadda

0 Response to "Scholarship: परदेशी शिक्षण अर्जास मुदतवाढ, ऑनलाइन करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel