Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-12T13:43:58Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC ESE Exam 2022: यूपीएससी ईएसई परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या Rojgar News

Advertisement
ESE Exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) च्या माध्यमातून इंजिनीअरिंग सेवा परीक्षा २०२२ चे आयोजन करत आहे. ही परीक्षा तीन स्तरांत घेतली जाणार आहे. प्रथम प्राथमिक परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत होणार आहे. इंजिनीअरिंग सेर्व्हिसेस प्राथमिक परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी आणि मुख्य परीक्षा २६ जून २०२२ रोजी घेतली जाणार आहे.देशभरातीललाखो उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहत आहेत. तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. या परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊया. ESE परीक्षा पॅटर्न (ESE Exam Pattern) स्टेप १- याला ESE प्राथमिक परीक्षा असेही म्हणतात. या पेपरमध्ये पहिला पेपर २०० आणि दुसरा पेपर ३०० गुणांचे असे दोन वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना एकूण कटऑफ तसेच दोन्ही पेपर्सचा कटऑफ स्वतंत्रपणे क्लिअर करावा लागेल. स्टेप २- याला ESE मुख्य परीक्षा असेही म्हणतात. केवळ पूर्व परीक्षेमध्ये पात्र ठरलेले उमेदवारच या टप्प्यात उपस्थित राहू शकतात. यात ३००-३०० गुणांचे दोन वर्णनात्मक पेपर असतात. स्टेप ३- वैयक्तिक मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी हा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. हा टप्पा २०० गुणांचा आहे. ईएसई परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. ESE प्राथमिक परीक्षेत २ वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात तर मुख्य परीक्षेत २ पारंपारिक पेपर असतात. ESE प्रिलिम्स पेपर १ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सारखा आहे. तर पेपर २ हा सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील उमेदवाराचा इंजिनीअरिंग विषय आहे. दोन्ही परीक्षांचे माध्यम फक्त इंग्रजी आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्राथमिक परीक्षेत एक तृतीयांश गुण वजा केले जातील. ईएसई प्राथमिक परीक्षेचा अभ्यासक्रम (ESE Preliminary Exam Syllabus) पेपर १ सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी योग्यता (General Studies and Engineering Aptitude) सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समकालीन समस्या. तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, इंजिनीअरिंग मॅथ्स आणि संख्यात्मक विश्लेषण, डिझाइनची सामान्य सिद्धांत, ड्रॉइंग, उत्पादन, सुरक्षेचे महत्व, उत्पादन, देखभाल आणि सेवा, ऊर्जा आणि पर्यावरणाची मूलभूत तत्त्वे: संवर्धन, पर्यावरण आणि प्रदूषण हवामान बदल करण्यासाठी इंजिनीअरिंग योग्यता, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, प्रकल्प व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, जलवायू परिवर्तन, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, इंजिनीअरिंगची मूलभूत तत्त्वे, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आधारित साधने आणि त्यांचे अभियांत्रिकीमधील अनुप्रयोग. उदा.नेटवर्किंग, ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञान-आधारित इंजिनीअरिंगमधील नैतिकता आणि मूल्ये पेपर २ सिव्हिल इंजिनीअरिंग (Civil Engineering) बांधकाम साहित्य, घन यांत्रिकी, संरचनात्मक विश्लेषण, स्टील संरचनांचे डिझाइन, काँक्रीट आणि दगडी बांधकाम संरचना, बांधकाम सराव, नियोजन आणि व्यवस्थापन, द्रव प्रवाह, हायड्रोलिक्स मशीन्स आणि जलविद्युत, जलविज्ञान आणि जल संसाधन इंजिनीअरिंग, पर्यावरण इंजिनीअरिंग, भू-इंजिनीअरिंग फाऊंडेशन आणि तंत्रज्ञान. सर्वेक्षण आणि भूविज्ञान, वाहतूक इंजिनीअरिं इ. मॅकेनिकल इंजिनीअरिंग (Mechanical Engineering) फ्लुइड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स आणि हीट ट्रान्सफर, आयसी इंजिन्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, टर्बो मशिनरी, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी, इंजिनीअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मटेरिअल्स, मेकॅनिझम आणि मशिन्स, मशीन एलिमेंट्सची रचना, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग. मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग (Electric Engineering) इंजिनीअरिंग मॅथ्य, इलेक्ट्रिकल मटेरिअल्स, इलेक्ट्रिक सर्किट्स आणि फील्ड्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट, कॉम्प्युटर फंडामेंटल्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, अॅनालॉग, आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सिस्टम आणि सिग्नल प्रोसेसिंग, कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टम, पॉवर सिस्टम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राइव्ह इ. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (Electronics and Communication Engineering) बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, इलेक्ट्रॉनिक मापन आणि इन्स्ट्रुमेंटेशन, नेटवर्क थिअरी, अॅनालॉग आणि डिजिटल सर्किट्स, अॅनालॉग आणि डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम्स, कंट्रोल सिस्टम्स, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि आर्किटेक्चर, इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स विषय, अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स इ.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DbOxF4
via nmkadda