Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२, जानेवारी ११, २०२२ WIB
Last Updated 2022-01-11T15:00:52Z
Rojgar

बीएड, लॉ, एबपीएड, एमएड, बीपीएडचे नियोजन कोलमडले

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक अभियांत्रिकी, फार्मसी यासह काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, बीएड, लॉ, एबपीएड, एमएड, बीपीएड यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच आहेत. या प्रवेश प्रक्रिया संपण्यास फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याने या अभ्यासक्रमांचे यंदाचे शैक्षणिक नियोजन पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या बीएड, एमएड, बीपीएड, लॉ, एमपीएड यासारख्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ( Cell) अद्यापही सुरू आहेत. या प्रक्रिया पूर्ण होण्यास अजूनही महिनाभराचा काळ बाकी असल्याने या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक नियोजन कोलमडणार असल्याचे चित्र आहे. सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सर्व राऊंड पूर्ण झाले आहेत, तर काही अभ्यासक्रमांची केवळ अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किमान पात्रता पदवी पूर्ण असणे अशी आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे पदवी तृतीय वर्षाचा निकाल असणे आवश्यक असते. राज्यातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देतात. या विद्यापीठांचे परीक्षेचे नियोजन स्वतंत्र असल्याने प्रत्येक विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या निकालाप्रमाणे या प्रवेशांचे नियोजन केले जात असल्याचे सीईटी सेलमार्फत सांगण्यात आले. परंतु, या नियोजनानुसार या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू होण्यास फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. त्यामुळे या महाविद्यालयांसमोर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून घेण्याचे आव्हान असेल. नऊ महिने विलंब कोव्हिडपूर्व काळामध्ये मार्च ते जुलै दरम्यान या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाऊन एप्रिलमध्ये परीक्षांचे नियोजन केले जात असे. मात्र, यंदा डिसेंबरमध्येही प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, ती फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे यंदा या प्रक्रियेला जवळपास नऊ महिने विलंब झाला आहे. कोव्हिडमुळे दोन वर्षांपासून अभ्यासक्रमाच्या नियोजनात अनेक बदल करावे लागले आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. १८० दिवसांचा कोर्स वर्क पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यामुळे परीक्षांनाही मोठ्या प्रमाणावर विलंब होणार आहे. - डॉ. स्वप्नील निर्मळ, प्राचार्य, मोतीवाला बीएड महाविद्यालय ...अशी आहे मुदत - एम. पी. एड. २४ जानेवारी - एम. एड. २५ जानेवारी - लॉ (पाच वर्षे) : ९ फेब्रुवारी - लॉ (३ वर्षे) ११ फेब्रुवारी - बी. पी. एड. : १४ फेब्रुवारी - बी. एड. : २६ फेब्रुवारी


source https://maharashtratimes.com/career/career-news/mht-cet-admission-2021-law-bped-med-bed-course-admission-process-yet-to-complete/articleshow/88835432.cms