Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ५ जानेवारी, २०२२, जानेवारी ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-01-05T09:00:36Z
Rojgar

कशी केली CAT परीक्षा क्रॅक; Topper चिराग गुप्ताने सांगितलं यशाचं रहस्य

Advertisement
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत (आयसर) शिकणाऱ्या चिराग गुप्ता या विद्यार्थ्याने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम, अहमदाबाद) प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळवला आहे. चिरागला १९८ पैकी १७६ गुण मिळाले असून, तो ‘ऑल इंडिया रँकिंग’मध्ये पहिला आला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये राहणाऱ्या चिरागने आपल्या फिजिक्स विषयाच्या आवडीसाठी आयआयटी खडगपूरमध्ये मिळालेला प्रवेशही सोडून दिला होता. नंतर फिजिक्सही आपल्याला आयुष्यभर करायचे नाही असे ठरवून त्याने आपला मोर्चा आयआयएमकडे वळवला आणि इथेही देशात पहिला येऊन आपलं वेगळेपण दाखवून दिलं. ज्या नऊ जणांना कॅट निकालात १०० पर्सेंटाइल गुण मिळाले, त्यामध्ये चिरागचे गुण सर्वाधिक आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चिराग म्हणाला, 'मी खूप सारे फिजिक्स प्रोजेक्ट केले. पण दीड वर्षांपूर्वी मला फिजिक्स सोडून अन्य वाट खुणावू लागली. मी IISER जॉइन केलं तेव्हा मला भौतिकशास्त्रात जितका रस होता, तितका तो नंतर वाटेनासा झाला. आता मला मॅनेजमेंट पदवी घेतल्यावर स्ट्रॅटेजी कन्सल्टिंगमध्ये करिअर करायचं आहे.' चिराग आयसरच्या बीएसएमएस या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षात शिकत असून, ‘वॉटर पॉवर्टी’ या विषयावर तो काम करीत आहे. त्याला व्यवस्थापन क्षेत्रात काम करायचे असल्याने चिरागने ‘आयआयएम’ची प्रवेश परीक्षा दिली होती. त्यात तो पहिला आला आहे. लवकरच तो ‘आयआयएम’मध्ये दाखल होणार आहे. आयसर या संस्थेतून यापूर्वीही अनेक विद्यार्थी ‘आयआयएम’मध्ये दाखल झाले आहेत. परंतु, प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर पहिला येणारा चिराग गुप्ता हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. मॉक टेस्टवर भर चिरागने मार्च नंतर CAT ची तयारी सुरू केली. त्याने मॉक टेस्टवर भर दिला. चिराग म्हणाला की, 'मी गणिताचे सर्व फॉर्म्युले विसरलो होतो, मला पुन्हा बारावीची पुस्तकं पाहावी लागली. मी कॅटची तयारी करणाऱ्यांना हेच सांगेन की जास्तीत जास्त सराव चाचण्या द्याव्यात. मी जेव्हा जेव्हा मॉक टेस्ट द्यायचो तेव्हा पहिली १५ मिनिटं थांबायचो आणि स्वत:वर जास्तीत जास्त प्रेशर देण्याचा प्रयत्न करायचो. मी हेही सांगेन की डेटा इंटरप्रिटेशन प्रश्न वेळखाऊ असले तरी आवर्जून सोडवायचे.'


source https://maharashtratimes.com/career/career-news/cat-topper-2021-mumbai-goregaon-boy-chirag-gupta-tops-cat-with-100-percentile/articleshow/88707232.cms