Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २९ जानेवारी, २०२२, जानेवारी २९, २०२२ WIB
Last Updated 2022-01-29T07:43:58Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Khan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय? Rojgar News

Advertisement
Khan Sir

Khan Sir Latest News नवी दिल्ली : शिक्षक आणि युट्यूबर खान सर (Khan Sir) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. रेल्वे भरती बोर्डाच्यावतीनं (RRB) एनटीपीसी परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर करण्यात आला होता. परीक्षेचा निकाल आणि आरआरबी एनटीपीसी परीक्षा (RRB NPTC exam format) स्वरुपात विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलनं केली होती. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप खान सर यांच्यावर आहे. खान सर यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान खान सरांनी एक व्डिहीओ जारी करत विद्यार्थ्यांनी आंदोलनात उतरी नये. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन केलं आहे. पाटणा येथील पत्रकार नगरमध्ये त्यांच्या विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे. रेल्वे भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचं म्हटलं होतं. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आरआरबी विरोधात जोरदार आंदोलन केलं होतं.

खान सर याचं नाव काय?

खान सर हे यूट्यूब आणि डिजीटल मीडियाचा वापर करुन कोचिंगसाठी प्रसिद्ध आहेत. पाटणामध्ये त्यांचं खान जीएस रिसर्च सेंटर असून ते खूप लोकप्रिय आहे. अनोख्या अध्यापन पद्धतीमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. पीटीआयनं दिलेल्या बातमीनुसार खान सर यांनी त्यांचं नाव यापूर्वी कधी जाहीर केलं नाही.बहुतांश लोक त्यांना खान सर या नावानं ओळखतात. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ नावाचा वाद निर्माण झाला होता. खान सरांचं नाव फैसल खान असून ते उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. खान सरांनी अद्याप त्यांची वैयक्तिक ओळख जाहीर केलेली नाही.

खान सर यांच्याविरोधात एफआयआर

आरआरबी आणि एनटीपीसी फेज 1 परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. या आंदोलानाला हिंसक वळण लागलं होतं. या प्रकरणी खान सर आणि इतर पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी खान सरांनी त्यांना आंदोलन करण्याबाबत प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.आंदोलक विद्यार्थी आणि क्लासेस चालकांनी मिळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. पाटणा शहरातही हिंसा करण्याचा कट करण्यात आल्याचा आरोप एएफआयरमध्ये करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये आरा स्टेशनवर एका ट्रेनच्या इंजिनला आग लावली होती.

खान सरांकडून शांततेचं आवाहन

रेल्वे भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्यानंतर खान सरांनी एक व्हिडीओ जारी करत विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याच आवाहन केले होतं. हिसंक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थन करणार नाही, असं ते म्हणाले. जर विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसंक आंदोलनात माझी भूमिका आहे, असं पोलिसांना वाटत आहे तर त्यांनी मला अटक करावी, असं खान सर म्हणाले.खान सरांच्या समर्थनात माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची हिंदुस्तानी आवाम मोर्चा उतरला आहे.

इतर बातम्या:

Nagpur Accident | द बर्निंग कार! ताबा सुटल्याने डिव्हायडरवर आदळून पेटली कार; चालकाचा मृत्यू नेमका कसा झाला?

Fire in Gandhidham Puri Express : ‘द बर्निंग ट्रेन’, नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग, प्रवासी हादरले; धावपळ आणि किंचाळ्यांमुळे एकच गोंधळ

Khan Sir all you need to know Who is Khan Sir and Why he is underground after FIR in RRB NTPC Student Protest Incident in Bihar


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Khan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय?https://bit.ly/3s3OtTc