Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२, जानेवारी ३१, २०२२ WIB
Last Updated 2022-01-31T08:00:39Z
Rojgar

NHPC मध्ये विविध पदांची भरती, १ लाखपर्यंत मिळेल पगार

Advertisement
JE 2022: सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या ज्युनिअर इंजिनीअरिंग पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) इंडियाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सिविल इंजिनीअर, इलेक्ट्रीकल इंजनीअर आणि मॅकेनिकल इंजिनीअर पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी (NHPC JE Recruitment 2022) अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना एनएचपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवर दिलेल्या निर्देशांच्या मदतीने तुम्ही अर्ज भरू शकता. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) इंडियाच्या वतीने या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील वाचल्यानंतर उमेदवार nhpcindia.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी कॉम्प्युटर आधारित ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – ३१ जानेवारी २०२२ अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२२ असा भरा अर्ज अर्ज भरण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- nhpcindia.com वर जा. वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा. आता NHPC मधील ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) पदासाठीच्या भरतीच्या लिंकवर जा. उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा. नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरु शकता. शैक्षणिक पात्रता सिविल ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पूर्णवेळ नियमित डिप्लोमामध्ये किमान ६० टक्के असणे गरजेचे आहे. बीटेक किंवा बीई या समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रीकल ज्युनिअर इंजिनीअर पदाच्या भरतीसाठी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ नियमित डिप्लोमामध्ये किमान ६० टक्के गुण असावेत. बीटेक किंवा बीईच्या समकक्ष शिक्षण असावे. मॅकेनिकल ज्युनिअर इंजिनीअर या पदावरील भरतीसाठी, शासकीय मान्यताप्राप्त संस्थांमधून किमान ६०% गुणांसह संबंधित पूर्णवेळ नियमित डिप्लोमा असावा. तसेच बीटेक किंवा बीईच्या समकक्ष शिक्षण पूर्ण असावे. पगार ज्युनिअर इंजिनीअर पदांवर निवडलेल्या उमेदवारांना २९ हजार ६०० ते १ लाख १९ हजार ५०० रुपये प्रति महिना पगार मिळेल. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या रिक्त पदासाठी उमेदवारांना २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nhpc-je-recruitment-2022-bumper-recruitment-for-the-posts-of-junior-engineer-apply-by-21-february/articleshow/89236350.cms