Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १५ जानेवारी, २०२२, जानेवारी १५, २०२२ WIB
Last Updated 2022-01-15T09:00:29Z
Rojgar

NIOS दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Advertisement
NIOS : ऑक्टोबर-नोव्हेंबर पब्लिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग(National Institute of Open Schooling, NIOS) ने दहावी (Secondary course, Class X)आणि बारावी स (Senior secondary course, Class XII) वर्गांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर सार्वजनिक परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण तपासता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना एनआयओएसची अधिकृत वेबसाईट nios.ac.in, results.nios.ac.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. याशिवाय, विद्यार्थी बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात. दहावी आणि बारावी निकाल २०२१ ची घोषणा अधिकृत ट्विटर हँडलद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार, 'NIOS ने आज दहावी आणि बारावी अभ्यासक्रमांच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दहावी अभ्यासक्रमासाठी एकूण ५७, २५८ विद्यार्थी आणि बारावी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी ८२, ०४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. NIOS Result: असा पाहा निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सार्वजनिक परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम दहावी, बारावीचे विद्यार्थी NIOS या वेबसाइट results.nios.ac.in वर जा. आता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल - ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१' या लिंकखाली, 'चेक रिझल्ट' या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा एनरोलमेंट नंबर आणि कॅप्चा कोड भरा. आता परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर परीक्षेचा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट काढा. परीक्षेच्या तारख जाहीर एनआयओएस (NIOS)पब्लिक एक्झाम (NIOS Public Exam 2022) एप्रिल-मे २०२२ मध्ये घेतल्या जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणार्‍या सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी वर्गांसाठी थ्योअरी परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एनआयओएसने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. एप्रिल २०२२ साठी सिनीअर आणि सिनीअर सेकेंडरी अभ्यासक्रमांसाठी पुढील NIOS पब्लिक (थ्योअरी) परीक्षा ६ एप्रिल २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या परीक्षा केंद्रांसाठी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3fhQZj5 द्वारे एनआयओएस ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षा केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई/राज्य मंडळांशी संलग्न सरकारी/खासगी शाळांसह एनआयओएस मान्यताप्राप्त संस्थांमध्ये घेतल्या जाणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशननुसार, संस्थेने शाळांच्या मुख्याध्यापकांना एनआयओएसच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/nios-october-november-public-result-declared-57000-students-of-10th-12th-check/articleshow/88910973.cms