Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ जानेवारी, २०२२, जानेवारी २२, २०२२ WIB
Last Updated 2022-01-22T09:00:19Z
Rojgar

UGC NET जून २०२१, डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर

Advertisement
2021: विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२० (UGC NET 2020, 2021 ) उत्तरतालिका जाहीर केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डिसेंबर आणि जून टप्प्यातील यूजीसी नेट २०२१ च्या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांची उत्तरे तपासता येणार आहेत. वेबसाइट तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात. यूजीसी नेट उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. त्यानंतर होमपेजवर यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ साठी लिंकवर क्लिक करा. स्क्रिनवर उत्तरतालिकेचे पेज खुले होईल. यावर ऍप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. उत्तरतालिका डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआउट घ्या. यूजीसी नेट उत्तरतालिका डाऊनलोड केल्यानंतर, उमेदवारांना त्यांची उत्तरे तपासा. यामध्ये काही त्रुटी असल्यास ते आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. एनटीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ परीक्षा तीन टप्प्यात घेतली होती. त्यानुसार, पहिला टप्पा २० नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आला. दुसरा टप्पा २४ डिसेंबर २०२१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान पार पडला. तिसरा टप्पा ४ आणि ६ जानेवारीला पार पडला. त्यात कन्नडच्या पुनर्परीक्षेचाही समावेश होता. एकूण ८१ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व परीक्षांची उत्तरतालिका आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. त्यानंतर लवकरच निकालही जाहीर केला जाणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-net-2021-answer-key-nta-ugc-net-june-2021-december-2020-answer-key-release-check-result-date-here/articleshow/89053866.cms