Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२, जानेवारी ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-01-07T09:00:56Z
Rojgar

YCMOU Recruitment 2021: यशवंतराव चव्हाण विद्यापीठात भरती, २ लाखापर्यंत मिळेल पगार

Advertisement
YCMOU : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वित्त अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर डिग्रीमध्ये ५५ टक्के असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे असिस्टंट मॅनेजर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे संशोधन/उच्च शिक्षण संस्थेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराचे ४५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर पदाचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. सरकारी आणि विद्यापीठ नियमानुसार उमेदवाराला निवृत्ती लाभ मिळणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला १ लाख ३१ हजार १०० ते २ लाख १६ हजार ६०० रुपये पगार मिळू शकणार आहे. सरकारी नियमानुसार सातवे वेतन लागू होणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज फायनान्स ऑफिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर डिमजवळ, नाशिक- ४२२ २२२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना २० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ycmou-recruitment-2021-finance-officer-post-vacant-in-yashwantrao-chavan-of-maharashtra-open-university/articleshow/88751262.cms