Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी १६, २०२२ WIB
Last Updated 2022-02-16T07:00:36Z
Rojgar

CA Inter परीक्षेचा निकाल कधी? कुठे पाहाल?...जाणून घ्या तपशील

Advertisement
CA Inter : सीए इंटर निकाल २०२२ ची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI) द्वारे चार्टर्ड अकाउंटंट अंतिम आणि फाउंडेशन कोर्सचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यानंतर आता इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल देखील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. आयसीएआयतर्फे या आठवड्यात सीए इंटर निकाल २०२२ (CA 2022) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. हा निकाल गेल्या काही वर्षांच्या ट्रेंडवर आधारित आहे. साधारणपणे, जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांच्या इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल अंतिम निकालानंतर १० दिवसांच्या आत आयसीएआयतर्फे जाहीर केले जातात. ICAI कडून अंतिम परीक्षेचा निकाल १० फेब्रुवारीला जाहीर झाला असताना इंटर (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) चा निकाल २० फेब्रुवारीपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सीए इंटर निकाल २०२२ च्या तारखेबाबत आयसीएआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सीए इंटर परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org तसेच caresults.icai.org वर जाऊन निकालासंदर्भातील अपडेट तपासू शकतात. आयसीएआयने ६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत विविध नियोजित तारखांना जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासाठी सीए इंटरमिजिएट कोर्सच्या डिसेंबर २०२१ च्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. यापूर्वी संस्थेने सीए इंटर जुलै २०२१ च्या परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर केला होता. जुलै सत्र परीक्षांमध्ये नवीन अभ्यासक्रमाच्या ग्रुप १ मध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७,५६३ म्हणजेच २९.११ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रुप २ मध्ये ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी बसले आणि १००८२ म्हणजेच २२.२ टक्के उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचे तर, ग्रुप १ च्या परीक्षेत ८८७३ विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी केवळ ३८५ म्हणजेच ४.३४ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते. ग्रुप २ मध्ये २६ हजारांहून अधिक उमेदवार बसले होते आणि ७९६७ (३०.१३ टक्के) उत्तीर्ण झाले होते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ca-inter-result-2022-declaration-of-chartered-accountant-inter-exam-results-possible-till-this-date-see-score-card-like-this/articleshow/89608585.cms