Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी २४, २०२२ WIB
Last Updated 2022-02-24T06:00:35Z
Rojgar

MPSC कडून ५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Advertisement
2022: सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने () तांत्रिक सेवांसाठी (Technical Service) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पदभरतीचा तपशील एमपीएससीने जाहीर केलेल्या भरतीद्वारे, निवड झालेल्या उमेदवारांना वनरक्षक (Forest Guard), कृषी अधिकारी (Agriculture Officer), सहायक कार्यकारी अधिकारी (Assistant Executive Officer), सहायक अभियंता (Assistant Engineer) आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी (Sub-Divisional Water Reservation Officer) या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. भरतीमध्ये एकूण ५८८ रिक्त पदे आहेत. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये उमेदवारांना अधिक तपशील मिळू शकणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा एमपीएससी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार पात्रता मागविण्यात आली आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवरीन नोटिफिकेशन तपासू शकतात. अर्जदारांची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असावी. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - २१ फेब्रुवारी २०२२ अर्ज करण्याची अंतिम तारीख - १४ मार्च २०२२ प्राथमिक परीक्षेची तारीख - ३० एप्रिल २०२२ अर्ज प्रक्रिया एमपीएससी तांत्रिक सेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १४ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ही एक महत्त्वाची भरती आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील याची उमेदवारांनी नोंद घ्या. शेवटच्या क्षणी अधिकृत वेबसाइट ओव्हरलोड झाल्यामुळे, उमेदवारांना अर्ज करताना देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असा करा अर्ज पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-recruitment-2022-maharashtra-public-service-commission-has-recruited-more-than-500-posts-know-the-complete-process-of-application/articleshow/89791000.cms