TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई पोलिसाचा मुलगा न्यूझीलंडमध्ये पोलीस अधिकारी बनला, कधीकाळी वेटर म्हणून काम केलेल्या विशाल बडेच्या संघर्षाची गोष्ट Rojgar News

Vishal Bade

मुंबई: महाराष्ट्रातील पोलिसाचा (Police) एक मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतो. नोकरीसाठी न्यूझीलंड (New Zealand) सारख्या देशात जातो. तिथेच हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण वेटरचं काम करत करत पूर्ण करतो. त्या क्षेत्रात अधिकारी पदावर पोहोचतो. मात्र, कोरोना (Corona) विषाणू संसर्गाचं संकट निर्माण होतं. हॉटेल व्यवसायावर संकट येत आणि नोकरी जाते. पुन्हा जिथून प्रवास सुरु केला तिथंचं पोहोचतो. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा देतो. स्पर्धा परीक्षेतील सर्व चाचण्या यशस्वी पार करतो आणि न्यूझीलंडच्या पोलीस दलात अधिकारी बनतो. ही गोष्ट मुंबई पोलीस दलात काम केलेल्या झुंबरराव बडे यांचा मुलगा विशाल बडे याची आहे. विशाल बडे सध्या न्यूझीलंड पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. आपल्यावर आलेल्या संकटाला संधी मानली काय करता येतं हे विशाल बडे या तरुणानं दाखवून दिलं आहे.

वेटर ते अधिकारी नेमका प्रवास कसा राहिला

विशाल बडे यानं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. पण, भारतात नोकरी न करता त्यानं परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं न्यूझीलंड या देशाची निवड केली. न्यूझीलंड मॅनेजमेंट अकॅडमी ऑकलंडमध्ये त्यानं नॅशनल डिप्लोमा इन हॉस्पिटीलीटी अँड टुरिझम मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केला. मे 2011 पासून वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केलेला विशाल 2020 पर्यंत हॉटेलमध्ये तो मॅनेजर या पदावर पोहोचला. मात्र, कोरोना विषाणू संसर्गानं त्याला नोकरी देखील गमावावी लागली.

कोरोना काळात नोकरी गमावल्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी

विशाल बडे यानं न्यूझीलंडमध्ये कामाला सुरुवात करताना ती वेटर या पदापासून केली होती. 2011 पासून कामाला सुरुवात करणारा विशाल बडे 2020 पर्यंत अधिकारी पदावर पोहोचला होता. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली. कोरोनाच्या लाटेचा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आणि विशाल बडे याला स्वत: ची नोकरी गमवावी लागली. यानंतर वडिलांप्रमाणंच सरकारी सेवेत जाण्याचा निर्णय विशाल बडे यानं घेतला. विशाल बडे यानं न्यूझीलंडमधील स्पर्धा परीक्षाची जोरदार तयारी केली आणि तो न्यूझीलंड पोलीस दलात अधिकारी पदावर रुजू झाला आहे. यानिमित्तानं वडील पोलीस दलात ते मुलगा पोलीस दलात अधिकारी हे एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.

विशाल बडे याची सोशल मीडिया प्रोफाईल 

इतर बातम्या :

कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती

SSC Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार, बोर्डाच्या शाळांना महत्त्वाच्या सूचना


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: मुंबई पोलिसाचा मुलगा न्यूझीलंडमध्ये पोलीस अधिकारी बनला, कधीकाळी वेटर म्हणून काम केलेल्या विशाल बडेच्या संघर्षाची गोष्टhttps://ift.tt/PVeGNBK

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या