युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिपत्रक

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिपत्रक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांना तेथील शिक्षण सोडून परतावे लागले आहे. यामध्ये राज्यातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हाती घेतले आहे. युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण सोडून पुन्हा स्वगृही परतले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी नेमके काय करता येऊ शकते याची माहिती घेण्याबाबत आरोग्य शिक्षणमंत्र्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सूचना केली होती. यानुसार युक्रेन या देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या आणि राज्यातील मूळ निवासी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे. या विद्यार्थ्यानी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेलेल्या विहित नमुन्यात त्यांची स्वत:ची माहिती भरुन विद्यापीठाच्या पात्रता विभागाला eligibility@muhs.ac.in या ईमेलवर पीडीएफ स्वरुपात पाठवावी असे आहवान विद्यापीठाच्या कुलसचिवांनी केले आहे. दरम्यान, या विद्याथ्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य व्हावे या उद्देशाने राज्य सरकार आणि पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल असे मत देशमुख यांनी बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभाच्यावेळी केले. तसेच विद्यापीठाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/muhs-collecting-data-of-students-returned-from-ukraine/articleshow/89977399.cms

0 Response to "युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिपत्रक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel