NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट

NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट

Date: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, नीट २०२२ (National Eligibility cum Entrance Test, NEET 2022 Examination) परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटनुसार, वैद्यकीय सल्लागार परिषदेने (Medical Advisory Council) एका बैठकीत जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) nta.ac.in आणि neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर १० मार्चपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदेच्या बैठकीत, MAC ने एनटीएला त्यांच्या 'सोयीनुसार' वेळापत्रकावर काम करण्यास सांगितले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या संभाव्य तारखांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी देखील बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'उपस्थित सदस्यांकडून यावर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या संभाव्य कालावधीबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी एनटीएला जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून तारीख निवडण्याची सूचना देण्यात आली आहे. यासोबतच MoE ने उन्हाळ्याच्या महिन्यांत आयोजित केलेल्या विविध प्रवेश परीक्षांचे (NTA) वेळापत्रक सादर केले. एनटीएकडून इतर पदवीपूर्व प्रवेश परीक्षा देखील आयोजित केल्या जातात. यामध्ये जेईई मेन्स २०२२ आणि सीयूसीईटी (जेएनयू, डियू इ. सह केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी) यांचा समावेश आहे. नीट ही एनटीएद्वारे घेतलेली आतापर्यंतची सर्वात मोठी परीक्षा आहे. ज्यामध्ये दरवर्षी साधारण १६ लाख विद्यार्थी बसतात. दुसरीकडे, या वर्षासाठी एमसीसीने नुकताच राऊंड २ जागा वाटपाचा निकाल जाहीर केला आहे. १५ टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी आयोजित केलेल्या या समुपदेशनासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-2022-exam-date-neet-ug-exam-may-be-held-in-the-last-week-of-june-know-when-the-notification-will-be-released/articleshow/89914131.cms

0 Response to "NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel