Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२, एप्रिल २६, २०२२ WIB
Last Updated 2022-04-25T22:48:14Z
careerLifeStyleResults

Important days in 26th April : 26 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

Advertisement

Important days in 26th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 एप्रिलचे दिनविशेष.

1920 : थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन.

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार हे एक महान भारतीय गणितज्ञ होते. आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी गणिताच्या क्षेत्रात केवळ अद्भुत शोध लावले नाहीत तर भारताला अतुलनीय वैभव मिळवून दिले.

1948 : अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा जन्म.

मौसमी चॅटर्जी या एक भारतीय अभिनेत्री आहेत. ज्या हिंदी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी विशेष ओळखल्या जातात. 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. तिने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

1976 : साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन.

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू हे एक मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने त्यांनी  कवितालेखन केले. 1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे' त्यांना प्रदान करण्यात आला. जोगवा (1959), दिवेलागण (1962), नक्षत्रांचे देणे (1975). कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी (1963), अजगर (1965), कोंडुरा (1966), त्रिशंकू (1968). नाटके : एक शून्य बाजीराव (1966), सगेसोयरे (1967), अवध्य (1972), कालाय तस्मै नमः (1972). कथासंग्रह : सनई (1964), गणुराया आणि चानी (1970), राखी पाखरू (1971) हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह.

1986 : रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

चेर्नोबिल, युक्रेन मधल्या अणुभट्टीचा 26 एप्रिल 1986 रोजी अपघाती स्फोट झाला. हिरोशिमाच्या तुलनेत चेर्नोबिलमधे जीवितहानी खूप कमी असली, तरी या अपघातामुळे हिरोशिमाच्या चारशे पट अधिक किरणोत्सर्गी वायू आणि सुक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणात फेकले गेले. या अपघाताचा सर्वात जास्त फटका बेलारूस प्रांतातल्या लाखो नागरिकांना कर्करोग, अर्भकांची अपुरी मानसिक वाढ आणि जनुकांमधले उत्परिवर्तन या व्याधींच्या स्वरूपात बसला.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Pdo4se5 days in 25th April : 25 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/lKe7h4f days in 24th April : 24 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/byX71GF Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Important days in 26th April : 26 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/78RsLNY