TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

JEE Mains Exam 2022 : जेईई मेन्सच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी ! ८ एप्रिल शेवटची तारीख Rojgar News

फॉर्ममधली चूक सुधारण्याची एक संधी

नवी दिल्ली : IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला. आता NTA ने विद्यार्थ्यांना जेईई मेन्सच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममधली चूक सुधारण्याची एक संधी दिली आहे. NTA ने करेक्शन विंडो (JEE Mains Correction Window) सुरु केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील ते NTA च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एप्रिलच्या सत्रात तुम्ही ते करू शकता. राष्ट्रीय परीक्षण एजेन्सी (NTA) द्वारे अर्जात सुधार करण्याची ही संधी विद्यार्थ्यांना फक्त एकदाच दिली जाणार आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर NTA ने अर्जात सुधार करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांना 8 एप्रिल 2022 रात्री 09.00 वाजेपर्यंत अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. यानंतर मात्र NTA कडून अर्जात सुधार करण्याची कोणतीच संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. अर्ज भरताना कोणतीही समस्या येत असेल तर विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या हेल्प लाईन नंबर किंवा अधिकृत मेलआयडी वर संपर्क साधावा.

हेल्प लाईन नंबर – 011-40759000

इमेल आयडी – jeemain@nta.ac.in

आधार कार्ड व्हेरीफाईड असणारे विद्यार्थ्यांना खालील बदल करणं शक्य

विद्यार्थी आई किंवा वडिलांचं नाव शोधू शकतात. JEE Mains Exam 2022 विद्यार्थी एक तर श्रेणी किंवा सब कॅटेगरी (PWD) यामध्ये बदल करू शकतात किंवा त्याचं (PWD) प्रमाणपत्र पुन्हा एकदा नव्याने अपलोड करू शकतात.

विद्यार्थी आपल्या निवडलेल्या विषयांमध्ये सुधार करू शकतात. विद्यार्थी आपलं जेईई मेन्स 2022 परीक्षेचं शहर किंवा माध्यम बदलू शकतात. तसंच दहावी बारावीच्या पासिंग ईयर मध्येही बदल करणं आता शक्य होणार आहे.

आधार कार्ड व्हेरीफाईड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील बदल करणं शक्य

विद्यार्थी आई किंवा वडिलांचं नाव शोधू शकतात. JEE Mains Exam 2022 विद्यार्थी एक तर श्रेणी किंवा सब कॅटेगरी (PWD) यामध्ये बदल करू शकतात किंवा त्याचं (PWD) प्रमाणपत्र पुन्हा एकदा नव्याने अपलोड करू शकतात.विद्यार्थी आपल्या निवडलेल्या विषयांमध्ये सुधार करू शकतात.

जन्म तारीख आणि लिंग यांत देखील सुधार किंवा बदल केला जाऊ शकतो. विद्यार्थी आपलं जेईई मेन्स 2022 परीक्षेचं शहर किंवा माध्यम बदलू शकतात. तसंच दहावी बारावीच्या पासिंग ईयर मध्येही बदल करणं आता शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांना आपल्या जेईई मेन्स 2022 च्या अर्जात बदल करण्यासाठी अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. फी भरण्यासाठी विद्यार्थी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआई किंवा पेटीएम चा वापर करू शकतात.

इतर बातम्या :

VIDEO | KKR vs MI, IPL 2022: सलग तिसऱ्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला, कॅमेरासमोर म्हणाला…

नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, त्यासाठी प्रयत्न करणार – Prasad Lad

Kirit Somaiya: INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला?, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा.. दादा…म्हणंत सोमय्या भडकले


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: JEE Mains Exam 2022 : जेईई मेन्सच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी ! ८ एप्रिल शेवटची तारीखhttps://ift.tt/HZBkJ5P

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या