NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार? Rojgar News

NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार? Rojgar News

NDA

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमीत प्रवेश परीक्षेतून इयत्ता बारावीनंतर भारतीय सैन्यदलात दाखल होण्याची संधी उपलब्ध होते. NDA/NA I 2022 साठी लेखी परीक्षेचे आयोजन 10 एप्रिलला केले जाणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admission letter for exam) यापूर्वीच जारी करण्यात आलं आहे. तसेच परीक्षार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. NDA/NA च्या 400 जागांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेत 5 ते 6 लाख परीक्षार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील एनडीए/एनए सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असल्यास तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरेल. सध्या ऑनलाईन अभ्यासक्रमही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाचे आकलन व परीक्षेचे योग्य नियोजन केल्यास निश्चितपणे यशाला गवसणी घालणं शक्य ठरणार आहे.

अभ्यासाची किती वर्षे :

प्रवेश परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर परीक्षार्थींना त्यांच्या पसंतीनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) किंवा नौदल अकादमी (NA)मध्ये प्रवेश दिला जातो. एनडीएत प्रवेश घेतल्यानंतर कॅडेट्सला तीन वर्षे शैक्षणिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. यानंतर प्रशिक्षणासाठी कॅडेट्सला त्यांच्या विंगच्यानुसार विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. एक वर्षांसाठी सैन्य प्रशिक्षण दिले जाते.

एनडीए मध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांचे तिन्ही दलांचे (सैन्य,नौदल आणि हवाईदल) प्रशिक्षण समान असते. तर नौदल अकादमीत दाखल होणाऱ्या परीक्षार्थींना 4 वर्षांचे शैक्षणिक आणि फिजिकल ट्रेनिंग भारतीय नौसेना अकादमीत दिले जाते.

पदवी कुणाची :

एनडीएत दाखल होणाऱ्या परीक्षार्थींना पहिली तीन वर्षे एनडीएत अभ्यास आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आयएमए, पुणे किंवा अन्य संस्थेत पाठविले जाते. एनडीएचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) ची पदवी दिली जाते (विंगनुसार बीए/बीएस्सी/बीएस्सी संगणक/बीटेक)

विद्यार्थी ते अधिकारी :

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षणदलांतील अधिकारी घडवण्याकरिता स्थापित पुण्यातील सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याअगोदर भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. वर्ष 1954 साली प्रबोधिनीची स्थापना झाली. पुण्यात तिन्ही दलाचे प्रशिक्षण दिले जाते.

इतर बातम्या : 

’10 ते 15 महिन्यात गोव्यात आमचं सरकार’, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांचा दावा!

Russia Ukraine war : रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे मोदींनी युद्धबंदीसाठी मांडलं परखड मत, भेटीत आणखी काय चर्चा?


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार?https://ift.tt/KsDcZTr

0 Response to "NDA EXAM 2022 : प्रवेशानंतर अभ्यासाची वर्षे किती, कोणती पदवी मिळणार? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel