Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२, एप्रिल ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-04-08T07:43:53Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Ph.D : Ph.D वाले इकडे लक्ष द्या ! ही बातमी फक्त तुमच्यासाठी Rojgar News

Advertisement
Ph.D वाले इकडे लक्ष द्या !

चंद्रपूर : Ph.D असणाऱ्यांना एक सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे. गुरु नानक कॉलेज ऑफ सायन्स अंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी (Candidates) लवकरात लवकर अर्ज (Application) करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 20 एप्रिल 2022 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आत खालील पत्त्यावर अर्ज करावा. या जागा भरण्यासाठी उमेदवारांची पात्रता ही त्या-त्या पदांनुसार असणार आहे. योग्य उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. एकूण उपलब्ध जागा या कॉलेजच्या आवश्यकतेनुसार असणार आहेत.

या पदासाठीचं वेतन नियमानुसार दिलं जाईल. अर्जासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. नोकरीचं ठिकाण चंद्रपूर असल्यामुळे चंद्रपूरमध्ये राहण्याची तयारी असणाऱ्यांनीच अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, जबाबदाऱ्या आणि इतर अधिक माहितीसाठी कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला https://www.gncollege.co.in/ भेट द्यावी. पदासाठीच्या वयाची अट, कमाल वय, किमान वय यासंदर्भातली कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

अर्ज कुठल्या पत्त्यावर पाठवणार ?

अध्यक्ष/ सचिव, गुरु नानक शिवण समिती विरूर / बल्लापूर

महत्त्वाचे मुद्दे

 • पदाचं नाव – प्राचार्य
 • एकूण जागा – आवश्यकतेनुसार
 • वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
 • शैक्षणिक पात्रता – Ph.D
 • वेतन – नियमानुसार
 • नोकरीचं ठिकाण – चंद्रपूर
 • अर्ज  – ऑफलाईन
 • अर्ज शुल्क – विनाशुल्क
 • निवड कशी होणार – मुलाखतीद्वारे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 एप्रिल 2022
 • अधिकृत वेबसाईट – https://www.gncollege.co.in/

इतर बातम्या :

UPSC: देशाच्या आणखी एका सर्वोच्च संस्थेवर मुंबईकराचा झेंडा, मनोज सोनी यूपीएससीच्या चेअरमनपदी

Mumbai Indians: ‘एका सीजनमध्ये त्याची किंमत 15-16 कोटी होती’, बोल्ड निर्णय घ्या, सेहवागने MI ला सुचवला पर्याय

Sanjay Raut : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी पैसा गोळा केला जातोय, संजय राऊतांचा आरोप

 

 

 

 

 

 

 

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ph.D : Ph.D वाले इकडे लक्ष द्या ! ही बातमी फक्त तुमच्यासाठीhttps://ift.tt/M9e2EZb